Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 3 Cheapest CNG Cars : 5 लाखांच्या बजेटमध्ये खरेदी करा या टॉप CNG कार, देतात 33.85 Kmpl मायलेज

इंधनाच्या किमती वाढल्याने तुम्हीही स्वस्त सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुतीच्या काही स्वस्त कार तुमच्यासाठी उपलब्ध हेत. या कार 33.85 Kmpl मायलेज देतात.

0

Top 3 Cheapest CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सध्या अनेक ऑटो कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार निर्मितीवर अधिक भर देत आहेत.

तुमचेही बजेट कमी असेल आणि टॉप सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुतीच्या सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहेत. या कार 33.85 Kmpl पर्यंत मायलेज देतात. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत.

Maruti Alto 800 CNG

मारुती सुझुकी Alto 800 सीएनजी कार तुमच्यासाठी स्वस्तातील मस्त कार आहे. ही कार सध्या बाजारात ४ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या बेस मॉडेलमध्ये CNG किटचा पर्याय दिला जात आहे. या कारची सीएनजी व्हेरियंटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5,03,000 लाख रुपये आहे तर ऑन रोड किंमत 5,55,187 रुपये आहे.

मारुती अल्टो 800 CNG इंजिन

मारुती सुझुकी अल्टो 800 CNG कारमध्ये ७९६ सीसी इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन CNG किटवर 41 PS पॉवर आणि 60 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 31.59 किमी प्रति लीटर मायलेज देते.

मारुती एस प्रेसो सीएनजी

मारुती सुझुकी एस प्रेसो कारमध्ये देखील सीएनजी पर्याय उपलब्ध हेत. ही कार देखील चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कारच्या बेस मॉडेल आणि टॉप मॉडेलमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.90 लाख रुपयांपासून सुरू होते तर ऑन रोड किंमत 6.42 लक्ष रुपयांपर्यंत जाते.

मारुती एस प्रेसो इंजिन

मारुती सुझुकी एस प्रेसो कारमध्ये 998 cc पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहे. हे इंजिन 56.69 PS पॉवर आणि 82.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 32.73 किमी प्रति किलो मायलेज देते.

मारुती अल्टो K10 CNG

मारुती सुझुकी अल्टो K10 कारमध्ये देखील सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. ही कार देखील चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामधील फक्त एका व्हेरियंटमध्ये CNG किटचा पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.94 लाख रुपये आहे. तर ही कारची ऑन रोड किंमत 6.47 लाख रुपये आहे.

मारुती अल्टो K10 CNG इंजिन

मारुती अल्टो K10 कारमध्ये 1.0 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सीएनजी किटवर ५७ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजीवर 33.85 किमी मायलेज देते.