Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 Best CNG Cars : आश्चर्यकारक मायलेज देणाऱ्या या आहेत टॉप 5 सीएनजी कार! किंमत १० लाखांपेक्षा कमी

सीएनजी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी भारतात अनेक कंपन्यांच्या जबरदस्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कार उपलब्ध आहेत. तसेच या कारची किंमत देखील जास्त नाही.

0

Top 5 Best CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तसेच सीएनजी कारच्या मागणीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. देशात अनेक कंपन्यांच्या सीएनजी कार ऑटो बाजारात उपलब्ध आहेत.

तुमचेही बजेट १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर आणि तुम्हाला सीएनजी आकार खरेदी करायची आहे तर काळी करू नका. खालील सीएनजी कार १० लाख रुपयांच्या किमतीपेक्षा कमी आहेत तसेच या कार मायलेजच्या बाबतीत देखील सर्वांच्या पुढे आहेत.

1. मारुती सुझुकी स्विफ्ट CNG

मारुती सुझुकी कंपनीच्या देशात सर्वाधिक कार विकल्या जात आहेत. तसेच या कंपनीच्या कारला देखील अधिक मागणी आहे. तुम्हाला या कंपनीची सीएनजी कार खरेदी करायची असेल तर स्विफ्ट CNG कार सर्वोत्तम पर्याय आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत ५.९९ लाख ते ९.०३ लाख रुपये आहे. मारुती सुझुकी कंपनीकडून ZXI CNG आणि VXI CNG अशी दोन मॉडेल गेल्या वर्षी लॉन्च केली आहेत. या कार किलो सीएनजीमध्ये 30.09 किमी मायलेज देतात.

2. मारुती सुझुकी बलेनो CNG

मारुती सुझुकी कंपनीची आणखी एक बलेनो सीएनजी कार 1 किलो सीएनजीमध्ये 30.61 किमी मायलेज देते. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर डेल्टा आणि झेटा दोन मॉडेलमध्ये सीएनजी कार उपलब्ध आहे.

बलेनो कारमध्ये कंपनीकडून 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 76 BHP ची कमाल पॉवर आणि 4,300 rpm वर 98.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बलेनो कारची एक्स शोरूम किंमत 8.28 लाख ते 9.21 लाख रुपये आहे.

3. Tata Tiago CNG

टाटा मोटर्सकडून ग्राहकांची सीएनजी कारकडे वाढती मागणी पाहता अनेक सीएनजी कार सादर केल्या जात आहेत. टाटाने त्यांची Tiago CNG कार गेल्या वर्षभरापूर्वी सादर केलीय आहे.

या कारचे एकूण सात प्रकार सदा करण्यात आले आहेत. XE, XT, XM, XZ, XZA, XZ+ आणि XZA+ हे प्रकार तुम्हाला Tiago कारमध्ये पाहायला मिळतील. या कारची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार सीएनजी मॉडेलमध्ये २६.४९ किमीचे मायलेज देते.

4. Tata Altroz ​​CNG

टाटा मोर्सची आणखी एक Altroz कार तुम्हाला सीएनजी प्रकारांमध्ये पाहायला मिळेल. या कारमध्ये Altroz ​​CNG XE, XM+ XM+ (S), XZ, XZ+ (S) आणि XZ+ O (S) अशी अनेक मॉडेल ऑफर केली जात आहेत.

टाटा Altroz ​​कारची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख ते 10.55 लाख रुपये आहे. या CNG कारमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन तीन-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

5. Hyundai Aura CNG

Hyundai कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Aura सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. ura S CNG ची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे आणि Aura SX CNG ची एक्स-शोरूम किंमत 8.87 लाख रुपये आहे. ही कार 1 किलो CNG मध्ये 24 किमी मायलेज देते.