Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 Cheapest EV Cars : Nexon EV ते MG Comet पर्यंतच्या या आहेत सर्वात स्वस्त EV कार्स, सिंगल चार्जमध्ये देतात 465 किमी रेंज

तुम्हीही या दिवाळीमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा मोटर्स आणि MG मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार उत्तम पर्याय आहेत.

0

Top 5 Cheapest EV Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हीही टाटा ते MG मोटर्सच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता.

खालील इलेक्ट्रिक कार कमी किमतीत जबरदस्त रेंज देण्यास सक्षम आहेत

MG Motor Comet

MG कार उत्पादक कंपनीची Comet इलेक्ट्रिक कार छोट्या कुटुंबासाठी उत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक कारची मोटर 42 bhp आणि 110 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 230 किमी रेंज देण्यास सक्षम आहे.

Tata Tiago EV

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. सध्या टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कारमध्ये सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण आहे. Tiago इलेक्ट्रिक कारमध्ये 19.2 kWh आणि 24 kWh असे दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत.

पहिला बॅटरी पॅक 60.3bhp आणि 110Nm जनरेट करते तर दुसरा बॅटरी पॅक 74bhp आणि 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 19.2 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेली टियागो इलेक्ट्रिक कार 250 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. तर 24kWh बॅटरी पॅक असलेली टियागो इलेक्ट्रिक कार 350 किमी रेंज देण्यास सक्षम आहे.

Citroen eC3

Citroen कार निर्मात्या कंपनीची eC3 इलेक्ट्रिक कार देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारमध्ये 29.2 kW बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये 320 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारची इलेक्ट्रिक मोटर 76 bhp आणि 143 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Tata Tigor EV

टाटा मोटर्सची Tigor EV कार देखील स्वस्त इलेक्ट्रिक कार पर्याय आहे. कारमध्ये 26kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये 315 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारची इलेक्ट्रिक मोटर 74 bhp पॉवर देण्यास सक्षम आहे.

Tata Nexon EV

टाटा मोटर्सची Nexon EV देखील जबरदस्त इलेक्ट्रिक कार आहे. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Nexon EV कारमध्ये 30kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Nexon Ev 30kWh बॅटरी पॅक असलेली कार 325 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच 40.5kWh बॅटरी पॅक असलेली Nexon Ev कार 465 किमी रेंज देण्यास सक्षम आहे.