Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 Cheapest Sunroof Cars : सनरूफसह येतात या टॉप 5 परवडणाऱ्या कार्स, किंमत १० लाखांपेक्षा कमी

सनरूफ असलेल्या कार खरेदी करण्याचा सध्या मार्केटमध्ये ट्रेंड सुरु आहे. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या कार खरेदी करता येत नाहीत. पण १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये सनरूफ कार उपलब्ध आहेत.

0

Top 5 Cheapest Sunroof Cars : ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या सनरूफ कार सादर केल्या आहेत. मात्र कारच्या किमती देखील खूपच जास्त आहेत. सनरूफ कार खरेदीसाठी ग्राहकांना विनासनरूफ कारपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

मात्र भारतात काही कंपन्यांच्या अशा काही सनरूफ कार्स आहेत ज्या अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांमध्ये सनरूफ फीचर्स असलेली कार खरेदी करण्याची क्रेझ सुरु आहे.

खालील सनरूफ कार्स १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत

Tata Altroz

टाटा Altroz ही एक स्वस्तातील सनरूफ फीचर्स असलेली कार आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आले आहे. या कारच्या सनरूफ येणाऱ्या व्हेरियंटहि एक्स शोरूम किंमत 7.35 लाख रुपये आहे. या कारला आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या मायक्रो एसयूव्ही Exter कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स दिले आहे. ही एक देशातील परवडणारी सनरूफ कार आहे. SX या व्हेरियंटमध्ये सनरूफ दिले जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.0 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय पंच एसयूव्ही कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स देण्यात आले आहे. सनरूफ असलेल्या पंच कारची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे. 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

महिंद्रा XUV300

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची XUV300 ही देखील स्वस्त सनरूफ कार आहे. कारच्या W4 व्हेरियंटमध्ये सनरूफ दिले आहे. या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.66 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट, 1.5-लीटर डिझेल युनिट आणि 1.2-लीटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

ह्युंदाई i20

ह्युंदाई मोटर्सकडून i20 कारच्या नवीन मॉडेलमध्ये सनरूफ पर्याय दिला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.28 लाख रुपये आहे. ही एक उत्तम प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कारमध्ये नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे.