Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 CNG Car In India : या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 सीएनजी कार! किंमत ६ लाखांपासून सुरु

तुम्हीही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील टॉप ५ सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. या कारचे मायलेज देखील जबरदस्त आहे.

0

Top 5 CNG Car In India : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलची वाहने न खरेदी करता अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. देशात अनेक कंपन्यांच्या स्वस्तातील सीएनजी कार उपलब्ध आहेत.

तुम्हालाही सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आज तुम्हाला देशातील स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत.

ह्युंदाई ऑरा सीएनजी

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ह्युंदाई ऑरा ही सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारच्या एस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 6.09 लाख रुपये आहे आणि एसएक्स व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 8.57 रुपयांपर्यंत जाते.

ऑरा सीएनजी कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 83 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्यामुळे तुम्ही ही स्वस्तातील सीएनजी कार खरेदी करू शकता.

Tata Tiago iCNG

सीएनजी कारच्या शोधात असाल तर टाटा मोटर्सची Tiago iCNG कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या सीएनजी कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात येत आहे. जे 86 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Tiago iCNG कार 26.49 kmpl चे मायलेज देते असे कंपनीचा दावा आहे. या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.82 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट सीएनजी कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर, ड्युअलजेट इंजिन देण्यात येत आहे जे 89 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कार 30.90 kmpl चे मायलेज देते. CNG पॉवरट्रेन फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स आणि VXi आणि ZXi या दोन प्रकारांसह येते. तुम्ही देखील ही स्वस्तातील कार खरेदी करू शकता.

Hyundai Grand i10 Nios

तुम्हीही नवीन सीएनजी कारच्या शोधात असाल तर तुम्ही स्वस्तातील Grand i10 Nios ही कार खरेदी करू शकता. या कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर इंजिन देण्यात येत आहे. जे 83 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी प्रकारांमध्ये या कारचे इंजिन पॉवर आउटपुट 68 bhp आणि टॉर्क 95 Nm पर्यंत पॉवर निर्माण करते.

ही कार मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अस्टा या 3 प्रकारांमध्ये ऑफर केली जात आहे. मॅग्ना व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 7.16 लाख रुपये, Sportz व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 7.70 लाख रुपये आणि Asta व्हेरिएंटची एक शोरूम किंमत 8.45 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर आयसीएनजी

टाटा मोटर्सच्या कारची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालली आहे. या कंपनीची सीएनजी कार तुम्हालाही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टिगोर आयसीएनजी कार बेस्ट पर्याय आहे. ही कार 1.2-लिटर इंजिनसह ऑफर करण्यात येत आहे. हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते.

CNG वर चालत असताना, हे इंजिन 73 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार XM, XZ आणि XZ Plus या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.40 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.59 लाख रुपये आहे.