Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 Mileage Hybrid Cars : वारंवार पेट्रोल पंपावर जाण्याचे टेन्शन मिटले! खरेदी करा दमदार मायलेज देणाऱ्या या उत्कृष्ट हायब्रीड कार्स, किंमत फक्त…

तुम्हीही सतत कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून वैतागला असाल तर काळजी करू नका. देशातील दमदार मायलेज देणाऱ्या हायब्रीड कार खरेदी करून तुम्ही इंधनावरील पैशांची बचत करू शकता.

0

Top 5 Mileage Hybrid Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना कमी मायलेज देणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल कार खरेदी करणे न परवडण्यासारखे झाले आहे. तुम्हालाही सतत पेट्रोल पंपावर जावे लागत असेल तर काळजी करू नका.

तुम्हीही देशातील लोकप्रिय हायब्रीड कार खरेदी करून वारंवार पेट्रोल पंपावर जाण्याला रामराम करू शकता. कारण हायब्रीड कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहेत. तसेच या कारमध्ये धमाकेदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

तुम्हाला या दिवाळीमध्ये शानदार हायब्रीड कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टोयोटापासून मारुतीपर्यंतच्या उत्कृष्ट हायब्रीड कार उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या हायरायडर एसयूव्ही कारमध्ये देखील हायब्रीड इंजिन दिले आहे. तसेच हायरायडर कारमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. भारतीय ऑटो बाजारातील ही सर्वात स्वस्त हायब्रीड कार आहे.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 16.46 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. हायरायडर हायब्रीड कार 27.97 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Honda City e:HEV

होंडा कार उत्पादक कंपनीची City e:HEV सेडान कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय उपलब्ध आहे. तुमच्यासाठी ही शानदार हायब्रीड सेडान कार सर्वोत्तम पर्याय आहे. City e:HEV सेडान कारची एक्स शोरूम किंमत 18.99 लाख रुपये ते 20.49 लाख रुपये आहे. कार हायब्रीड व्हेरियंटमध्ये 27.13 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती इन्व्हिक्टो

मारूती सुझुकीची आणखी एक इनोव्हा हायक्रॉसवर आधारित इन्व्हिक्टो हायब्रीड कार अलीकडेच भारतात सादर करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 23.24 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार 23.24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटा कार कंपनीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड कार देखील बाजारात सादर करण्यात आली आहे. सध्या हायब्रीड कारमध्ये टोयोटाचे चांगले वर्चस्व आहे. इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेल इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडची एक्स शोरूम किंमत 30.26 लाख रुपये आहे. ही कार 23.24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल, हायब्रीड आणि सीएनजी पर्याय दिला आहे. या कारच्या हायब्रीड व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 18.29 लाख रुपये ते 19.79 लाख रुपये आहे. ग्रँड विटारा हायब्रीड एसयूव्ही कार 27.97 Kmpl मायलेज देते.