Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

मोठ्या लोकांसाठी ह्या आहेत भारतातील पाच फुल साईज SUV ! किंमत सुरु होते ३० लाखांपासून । Top 5 SUV Car In India

0

Top 5 SUV Car In India : अलीकडे भारतात एसयुव्ही कारची मागणी वाढली आहे. प्रीमियम SUV कारचा आता एक मोठा चाहता वर्ग आपल्या देशात तयार झाला आहे. यामुळे देशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी एसयूव्ही कारचे प्रोडक्शन वाढवले आहे. टाटा, मारुती सुझुकी यांसह MG, टोयोटा, स्कोडा यांसारख्या कंपन्यांनी आता नवनवीन SUV कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे बाजारात प्रीमियम एसयुव्ही कार खरेदी करणाऱ्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण बाजारात एवढ्या एसयूव्ही आहेत की यापैकी कोणती एसयूवी चांगली आहे, कोणती एसयूवी खरेदी केली पाहिजे याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही खास तुमच्यासाठी भारतातील टॉप पाच एसयुव्ही कारची माहिती घेऊन हजर झालो आहोत. ज्या लोकांना प्रीमियम कार आवडतात अशा लोकांसाठी आज आम्ही ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील टॉप पाच एसयूव्ही कार आणि त्यांच्या विशेषता.

एमजी ग्लोस्टर : जर तुम्हाला सेवन सीटर एसयूव्ही खरेदी करण्याची इच्छा असेल तर MG ची ही प्रीमियम कार तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. MG Gloster ही भारतातील एक प्रीमियम कार म्हणून ओळखली जात आहे. तरुणांमध्ये या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक 7-सीटर SUV आहे. ही कार पावरफुल इंजिन, आरामदायी प्रवास आणि हायटेक फीचर्स मुळे अल्प कालावधीतच लोकप्रिय बनली आहे. या गाडीचा विक्रा दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रीमियम एसयूव्हीमध्ये तुम्हाला अनेक हायटेक फीचर्स मिळतील. यात 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,

एक 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर-टेलगेट आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे फीचर्स मिळणार आहेत. प्रीमियम गाड्यांमध्ये जे फीचर्स असतात ते सारे फीचर्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एमजी ग्लोस्टर मध्ये 2.0-लिटर, 4-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. कारचे इंजिन 215 PS पॉवर आणि 480 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 38.80 लाख रुपये एवढी ठेवली आहे.

टोयोटा फॉर्च्युनर : टोयोटा हा ब्रँड देशात खूपच लोकप्रिय ठरला आहे. कंपनीने देशात विविध कार आणल्या आहेत. पण जेव्हा देशातील प्रीमियम कारचा विषय निघतो तेव्हा फॉर्च्युनरचे नाव टॉप पाच मध्ये घ्यावेच लागते. ही गाडी मंत्र्यांची गाडी म्हणून ओळखली जाते. या कारचा रॉयल लूक या गाडीला इतरांपेक्षा वेगळे बनवत आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही देखील भारतातील एक प्रमुख सेवन सीटर प्रीमियम कार आहे. जर आपणास सेव्हन सीटर कार खरेदी करायची असेल तर ही कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही गाडी पावरफुल इंजिनसाठी आणि स्टायलिश लुक साठी बाजारात विशेष लोकप्रिय ठरली आहे.

या कार मध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. फिचर्सच्या बाबतीत या गाडीला जोड नाही. या गाडीत 2.7-लिटर, 4-सिलेंडर, पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 164 PS ची पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार मॉडेल उपलब्ध आहेत. या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.43 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

स्कोडा कोडियाक : बाजारात Skoda च्या देखील अनेक प्रीमियम कार तुम्हाला नजरच पडतील. यामध्ये कंपनीच्या Kodiaq या प्रीमियम कारचा देखील समावेश होतो. या कारमध्ये प्रीमियम गाड्यांमध्ये जे फीचर्स असतात ते सर्व फीचर्स मिळतात. यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,

360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर-टेलगेट आणि सनरूफ यांसारखे हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV कारची बेस मॉडेलची किंमत 38.51 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

फोक्सवॅगन टिगुआन : सेव्हन सीटर कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी फोक्सवॅगन कंपनीची टिगुआन ही कार देखील एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या 7-सीटर SUV मध्ये अनेक टॉप नॉच फीचर्स उपलब्ध होतात. ही गाडी रॉयल लुक देते. यामध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,

Volkswagen Tiguan Price Hike
Volkswagen Tiguan Price Hike

360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर-टेलगेट आणि पॅनोरॅमिक सनरुफ यांसारखे हायटेक फीचर्स मिळतात. या गाडीच्या बेस मोडेलची किंमत ही जवळपास 35.16 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

जीप मेरिडियन : जेव्हा केव्हा भारतातील टॉप SUV चा विषय निघतो ना तेव्हा जीप मेरिडियनचं नाव घ्यावच लागतं. ही या लिस्टमधील पाचव्या नंबरची गाडी असली तरी देखील फीचर्सच्या बाबतीत आणि लूकच्या बाबतीत ही गाडी सुद्धा इतर एसयुव्ही प्रमाणेचं A1 आहे. जीप मेरिडियनमध्ये अनेक टॉप नॉच फीचर्स आहेत.

Jeep Meridian Upland
Jeep Meridian Upland

यात 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे हायटेक फीचर्स कंपनीने दिलेले आहेत. कंपनीने या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.40 लाख रुपये एवढी ठरवून दिली आहे.