Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 SUV Cars : बाजारात धुमाखुळ घालत आहेत ‘या’ 5 हॅचबॅक SUV कार्स, विक्रीत सर्वात आघाडीवर; किंमत 5 लाखांपेक्षा कमी

बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या या कार आहेत. लोक्संनी या कारला सर्वात जास्त पसंती दिली आहे. या ' 5 हॅचबॅक SUV कार्स आहेत.

0

Top 5 SUV Cars : भारतीय बाजारात दरवर्षी अनेक नवनवीन कार लॉन्च होतात. मात्र आत्तापर्यंत लोकांनी सर्वात जास्त पसंत केलेल्या या कार आहेत. ‘या ‘ 5 हॅचबॅक SUV कार आहेत ज्या सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत.

तसे पाहिले तर लोकांना एसयूव्ही कार जास्त प्रमाणात आवडतात. हे लक्षात घेता अनेक कंपन्या आपली SUV वाहने हॅचबॅकच्या किमतीत विकत आहेत, पण लोकांमध्ये हॅचबॅकची क्रेझ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

हेच कारण आहे की गेल्या महिन्यात देशात सर्वाधिक विक्री झालेल्या पाच कारपैकी दोन हॅचबॅक होत्या. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स या भारतातील हॅचबॅक कार बनवणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत.

तुम्ही ऑगस्ट 2023 चा विचार केला तर मारुती सुझुकी हॅचबॅक कारच्या विक्रीत नंबर-1 आहे. तर टाटा मोटर्सची हॅचबॅक कारही लोकांना खूप आवडली. अशा वेळी तुम्ही या टॉप 5 कार्सबद्दल जाणून घ्या.

Maruti Suzuki Swift : ऑगस्टमध्ये मारुती स्विफ्ट देशातील नंबर-1 हॅचबॅक होती. गेल्या महिन्यात कंपनीने 17,896 युनिट्सची विक्री केली. मारुती सुझुकी स्विफ्ट त्याच्या कामगिरी आणि मायलेजसाठी लोकप्रिय आहे. मारुती स्विफ्ट भारतीय बाजारपेठेत 5.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.03 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Baleno : यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणारी कार बलेनो प्रीमियम हॅचबॅक आहे. कंपनीने हे गेल्या वर्षी फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लॉन्च केले होते, जे लोकांना खूप आवडते. फेसलिफ्टमध्ये लॉन्च झाल्यानंतर, त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात त्याची विक्री 16,725 युनिट्स होती. बलेनोची एक्स-शोरूम किंमत 6.61 लाख ते 9.88 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki WagonR : मारुतीच्या लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआरला लोक टॉल बॉय म्हणतात. 5.54 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेली ही कार तिच्या जबरदस्त मायलेजमुळे चांगली विकली जाते. कंपनी मारुती वॅगनआर 1000cc आणि 1200cc इंजिनमध्ये विकत आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 7.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Tiago : Tata Tiago ने गेल्या महिन्यात 8,982 मोटारींची विक्री केली. Tiago ही देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कारपैकी एक आहे. Tiago ची किंमत 5.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कंपनी ही कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये विकत आहे.

Maruti Suzuki Alto K10 : ही एक अशी कार आहे जी वर्षानुवर्षे लक्षात राहणारी आहे. मारुती सुझुकी अल्टो गेल्या 20 वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आहे, परंतु तरीही त्याचे आकर्षण कमी झालेले नाही. मात्र लोकांच्या हृदयावर राज्य करणारी Alto 800 आता बंद झाली आहे.

मात्र कंपनी 1000 cc इंजिन असलेली Alto K10 विकत आहे. ऑल्टो K10 च्या 7,099 युनिट्स ऑगस्ट 2023 मध्ये विकल्या गेल्या आहेत. Alto K10 ही देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक आहे ज्याची किंमत 4 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. अशा प्रकारे ही सर्वसामान्य कुटुंबासाठी एक उत्तम कार आहे.