Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 SUV Cars in India : देशात ‘या’ SUV ला आहे सर्वात जास्त मागणी! मिळेल स्टायलिश लूक आणि शक्तिशाली इंजिन

एका एसयूव्हीने क्रेटा, ब्रेझा आणि पंच यांना मागे टाकून विक्रीत नंबर-1 बनली आहे. पहा यादी.

0

Top 5 SUV Cars in India : अनेकजण आता SUV खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे मागणी जास्त असल्याने आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या SUV बाजारात लाँच होऊ लागल्या आहेत. तुम्ही तुमचे बजेट लक्षात घेता SUV खरेदी करू शकता.

भारतीय बाजारपेठेत SUV ला सर्वाधिक मागणी आहे. या यादीत प्रत्येक वेळी Hyundai Creta ही टॉप SUV राहिली होती, परंतु आता यात बदल झाला आहे. Hyundai Creta ची जागा दुसऱ्या कंपनीने घेतली आहे.

टाटा नेक्सॉन

भारतीय बाजारात Tata ने 14 सप्टेंबर 2023 रोजी नेक्सॉन फेसलिफ्ट लॉन्च केली असून नवीन अपडेट्ससह SUV ला मोठे बाह्य आणि अंतर्गत बदल यात दिले आहेत. विशेष म्हणजे लॉन्च झाल्यापासून एका महिन्यात, कंपनीने देशभरात नेक्सॉनच्या 15,325 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षीयाच महिन्यात १४,५१८ युनिटच्या तुलनेत या प्रमाणात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकी ब्रेझा ही बाजारात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या SUV पैकी एक आहे. मारुती एसयूव्हीच्या विक्रीत सप्टेंबर 2022 मध्ये 15,445 युनिट्सच्या तुलनेत 3 टक्के घट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

टाटा पंच

टाटा पंच हे तिसऱ्या क्रमांकावर असणारे टाटाचे आणखी एक लोकप्रिय मॉडेल आहे, कंपानीने मागील महिन्यात एकूण 13,036 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. नेक्सॉनप्रमाणेच पंचच्या विक्रीतही मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ह्युंदाई क्रेटा

Hyundai Creta ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या 12,717 युनिट्सची विक्री केली असून ती मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह ऑफर केली आहे.

ह्युंदाई व्हेन्यू

किमतीचा विचार केला तर या कारची किंमत रु. 12.44 लाख (एक्स-शोरूम) आहे. यासह, सब-फोर मीटर SUV ही ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी तिच्या विभागातील पहिली SUV असून बाजारात या मॉडेलची मागणी वाढली आहे. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये देशात 12,204 वाहनांची विक्री केली आहे.