Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 5 SUVs Discount Offer : दिवाळीच्या मुहूर्तावर महाबचत ऑफर ! Mahindra, Skoda आणि Citroen च्या SUVs वर मिळतेय 3.5 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट

नवीन कार खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण Mahindra, Skoda आणि Citroen कडून त्यांच्या अनेक एसयूव्ही कारवर मोठी सूट देण्यात येत आहे.

0

Top 5 SUVs Discount Offer : देशात सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कारवर मोठी सूट देण्यात येत असते.

या दिवाळीमध्ये तुम्हाला 3.5 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे. कारण Mahindra, Skoda आणि Citroen सारख्या कार उत्पादक कंपनीनकडून त्यांच्या शानदार एसयूव्ही कारवर मोठी सूट देण्यात येत आहे.

Mahindra XUV400 इलेक्ट्रिक SUV डिस्काउंट

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची देशातील ऑटो मार्केटमध्ये एकमेव XUV400 इलेक्ट्रिक SUV उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीकडून या कारवर 3.5 लाख रुपयांपर्यंतची मोठी सूट देण्यात येत आहे. कारची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे.

Jeep Meridian डिस्काउंट

Jeep कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Meridian एसयूव्ही कारवर देखील या महिन्यात आकर्षक सूट देण्यात येत आहे. कंपनीकडून या कारवर 1.30 लाख रुपयांची सूट देण्यात येत असल्याने तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता. कारमध्ये 2.0-लिटर, 4-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 168 bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Skoda Kushaq डिस्काउंट

स्कोडा कार उत्पादक कंपनीच्या लक्झरी फीचर्स कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना कंपनीकडून Kushaq एसयूव्ही कारवर 1.50 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे.

कारमध्ये 1.0-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तसेच दुसरे इंजिन 1.5-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे.

Citroen C5 Aircross डिस्काउंट

या दिवाळीमध्ये शानदार एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो अगदी योग्य आहे. कारण Citroen कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या C5 Aircross कारवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. C5 Aircross कारवर 2 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 37.67 लाख रुपये आहे.