Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 7 Cheapest CNG Cars : देशातील या आहेत खिशाला परवडणाऱ्या 7 CNG गाड्या, पहा कारची नावे आणि किंमत

सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटापासून मारुतीपर्यंतच्या स्वस्त सीएनजी कार बाजारात उपलब्ध आहेत. या कार मायलेजच्या बाबतीत देखील इतर कारच्या पुढे आहेत.

0

Top 7 Cheapest CNG Cars : देशात दिवसेंदिवस कारच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण सीएनजी कार खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत. सीएनजी कार सर्वाधिक मायलेज देण्यास सक्षम आहेत.

देशातील ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या १० लाख रुपयांपेक्षा अगदी कमी किमतीत सीएनजी कार्स उपलब्ध आहेत. तुम्हीही टाटा ते मारुतीपर्यंतच्या सीएनजी कार खरेदी करून पैशांची बचत करू शकता. या सीएनजी कार अगदी खिशाला परवडणाऱ्या आहेत.

मारुती अल्टो आणि अल्टो K10 S-CNG

मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कार सीएनजी कार अगदी स्वस्तात सादर केल्या आहेत. अल्टो आणि अल्टो K10 या कार तुमच्यासाठी उत्तम सीएनजी कार आहेत. Alto सीएनजी कारमध्ये 796cc इंजिन देण्यात आले आहे जे 40 bhp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ५.१३ लाख रुपये आहे.

Alto K10 CNG कार देखील अगदी तुमच्या खिशाला परवडणारी कार आहे. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 56 bhp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे.

मारुती एस-प्रेसो एस-सीएनजी

मारुती सुझुकीची एस-प्रेसो ही कार देखील सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 56 bhp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते. तुमच्या फॅमिलीसाठी एस-प्रेसो सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.91 ते 6.11 लाख रुपये आहे.

मारुती वॅगन-आर एस-सीएनजी

मारुती सुझुकीची वॅगन-आर सीएनजी कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वॅगन-आर सीएनजी कार तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी उत्तम ५ सीटर कार आहे. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 56 bhp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 6.44 ते 6.89 लाख रुपये आहे.

Tata Tiago iCNG

टाटा मोटर्सची Tiago सीएनजी कार देखील ऑटो बाजारात उपलब्ध आहे. कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 72 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. या हॅचबॅक कारमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 6.54 लाख ते 8.20 लाख
रुपये आहे.

मारुती सेलेरियो एस-सीएनजी

मारुती सुझुकीची सेलेरियो सीएनजी कार देखील तुमच्यासाठी उत्तम ५ सीटर कार आहे. कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.73 लाख रुपये आहे. ही एक तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम ५ सीटर सीएनजी कार आहे.

टाटा पंच iCNG

टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार पंच अलीकडेच सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये ट्विन सीएनजी सिलेंडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कारची एक्स शोरूम किंमत ७.०९ लाख ते ९.६७ लाख रुपये आहे.

Hyundai Grand i10 Nios CNG

Hyundai मोटर्सकडून देखील सीएनजी कारच्या मागणीमध्ये वाढ होत असताना त्यांची Grand i10 Nios CNG कार बाजारात सादर केली आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 68 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 7.58 लाख 8.13 लाख रुपये आहे.