Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 7 Seater Car : ही आहे देशातील 30 Kmpl मायलेज देणारी टॉप 7 सीटर MPV, किंमत 9 लाखांपेक्षा कमी

मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदीचा विचार असेल तर मारुतीची 30 Kmpl मायलेज देणारी टॉप 7 सीटर MPV कार तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या कारची किंमत देखील ९ लाखांपेक्षा कमी आहे.

0

Top 7 Seater Car : मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण ५ सीटर कारचाच पर्याय निवडतात. मात्र या ५ सीटर कार मोठ्या कुटुंबासाठी योग्य नाहीत. कारण यामध्ये फक्त ५ प्रवाशीच प्रवास करू शकतात. त्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर कारचा पर्याय योग्य आहे.

तुम्हालाही ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर देशातील टॉप ७ सीटर कारचा पर्याय तुम्ही निवडू शकता. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय ऑफर करण्यात येत आहे. तसेच या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

मारुती सुझुकीची एर्टिगा ७ सीटर कार देशातील लोकप्रिय फॅमिली कार बनली आहे. या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये ७ प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात. तुम्ही देखील एर्टिगा ७ सीटर कार खरेदी करून कुटुंबासोबत प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

एर्टिगा कार सध्या सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार आहे. कार दमदार मायलेज आणि शक्तिशाली इंजिनसह बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांसाठी एर्टिगा ७ सीटर कारचा एक उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा उत्तम इंजिन

मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय एर्टिगा ७ सीटर कारमध्ये शक्तिशाली 1.5 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 103 BHP पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे.

कारचे इंजिन सीएनजी मोडमध्ये 88 bhp पॉवर आणि 121 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. एर्टिगा ७ सीटर कारचे पेट्रोल व्हेरियंट 24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हेरियंट 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा किंमत

मारुती सुझुकी एर्टिगा कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत. तसेच कारची किंमत देखील कमी आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे. कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स ७ सीटर कार खरेदी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे.