Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top 7-Seater Cars In India : 8 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये खरेदी करा या 7 सीटर कार, मिळतात लक्झरी फीचर्स

नवीन ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार असेल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार कार उपलब्ध आहेत. टोयोटा ते मारुतीच्या कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

0

Top 7-Seater Cars In India : मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ६ आणि ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. बाजारात अनेक कंपन्यांच्या उत्तम ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील कमी आहेत.

तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर मारुती ते एर्टिगापर्यंतच्या अनेक स्वस्त कार उपलब्ध आहेत. काही कारमध्ये सीएनजी पर्याय देण्यात येत असल्याने ग्राहकांना या कार वापरणे देखील परवडत आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकीची एर्टिगा देशातील नंबर वन ७ सीटर कार आहे. मारुती एर्टिगा देशातील सर्वात जास्त विक्री होणारी ७ सीटर कार आहे. या कारमध्ये ७ प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

कारचे पेट्रोल व्हेरियंट 20.51 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी मॉडेल 26.11 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे.

टोयोटा rumion

टोयोटा कार कंपनीकडून मारुती एर्टिगाची डुप्लिकेट ७ सीटर कार Rumion कार सादर केली आहे. या कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीकडून या कारचे बुकिंग काही दिवसांपुरते बंद करण्यात आले आहे.

कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे. तसेच कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय देखील दिला आहे.

महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या अनेक शक्तिशाली इंजिन असलेल्या ७ सीटर कार बाजारात सादर केल्या आहेत. महिंद्राची ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बोलेरो निओ कारचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.64 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.15 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये प्रीमियम लक्झरी फीचर्स दिले आहेत. कारमध्ये सहज ७ प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात.