Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top ADAS Cars : कमी किमतीत उपलब्ध आहेत या 4 ADAS फीचर्स टॉप कार्स, XUV700 आणि Harrier चा समावेश

0

Top ADAS Cars : देशातील ऑटो मार्केटचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहेत. 2024 मध्ये देखील अनेक नवीन कार भारतात सादर केल्या जाणार आहेत.

कारच्या मागणीत वाढ झाली आहे मात्र अपघाताची संख्या देखील तितकीच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेल्या कारचा पर्याय निवडत आहेत. अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स देत आहे.

टाटा हॅरियर

टाटा मोटर्स त्यांच्या सर्वच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देत आहे. त्यामुळे टाटाच्या कार दमदार सुरक्षा फीचर्ससाठी ओळखल्या जात आहेत. टाटाने अलीकडेच त्यांची Harrier फेसलिफ्ट एसयूव्ही कार लाँच केली आहे.

या कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. टाटा मोटर्सकडून हॅरियर फेसलिफ्ट एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.20 लाख रुपये ठेवली आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.27 लाख रुपये ठेवली आहे.

ADAS सुरक्षा फीचर्समध्ये फ्रंट कोलिजन अलर्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, हाय बीम असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन चेंज अलर्ट, डोअर ओपन अलर्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, रिअर कोलिशन अलर्ट अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

MG Astor

MG कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Astor एसयूव्ही कारमध्ये देखील लेव्हल 2 ADAS सुरक्षा फीचर्स दिले आहे. यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर अलर्ट, लेन डिपार्चर मिटिगेशन, फ्रंट कोलिजन मिटिगेशन, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, इंटेलिजेंट हेडलॅम्प कंट्रोल आणि स्पीड असिस्ट अशा सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

कारमध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.82 लाख ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.69 लाख रुपये आहे. ही 5 सीटर एसयूव्ही कार तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे.

महिंद्रा XUV700

महिंद्राकडून त्यांच्या XUV700 एसयूव्ही कारमध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये दिले आहे. ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये लेन डिपार्चर अलर्ट, लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हाय बीम असिस्ट, ट्रॅफिक सिग्नल आयडेंटिफिकेशन, फ्रंट कोलिजन मिटिगेशन, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि स्मार्ट पायलट असिस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत14.03 लाख ते 26.53 लाख रुपये आहे.

होंडा सिटी E: HEV

होंडा कार उत्पादक कंपनीच्या सिटी E: HEV सेडान कारमध्ये ADAS फीचर्स देण्यात आले आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.89 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.39 लाख रुपये आहे. होंडाची सिटी E: HEV ही एक हायब्रीड सेडान कार आहे.