Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top Selling Cars : सर्वाधिक कार विक्रीमध्ये मारुतीच्या ४ आणि टाटाच्या एका कारने मारली बाजी! ऑगस्टमध्ये विकल्या तब्बल इतक्या हजार कार…

देशातील सर्व ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कार विक्रीचे अहवाल सादर केले आहेत. यामध्ये टॉप ५ कार विक्रीमध्ये मारुतीच्या चार कारचा समावेश आहे तर टाटाच्या एका कारचा समावेश आहे.

0

Top Selling Cars : ऑगस्ट महिना भारतीय ऑटो क्षेत्रासाठी खास राहिला आहे. या महिन्यात अनेक कंपन्यांनी नवीन कार आणि बाईक्स सादर करण्यात आल्या आहेत. तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये अनेक ग्राहकांनी नवीन कार खरेदी केल्या आहेत.

ऑगस्ट २०२३ महिन्यामध्ये सर्वाधिक कारची विक्री झाली आहे. मारुती सुझुकीच्या सर्वाधिक कार विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे मारुती कार विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे. तसेच दुसऱ्या नंबरवर ह्युंदाई आणि तिसऱ्या नंबरवर टाटा मोटर्स आहे.

सांविधिक विकल्या जाणाऱ्या टॉप ५ कारमध्ये ह्युंदाई मोटर्सच्या एकाही कारचा यामध्ये समावेश नाही. टॉप ५ विक्रीमध्ये मारुतीच्या चार आणि टाटा मोटर्सच्या एका कारचा समावेसग आहे. मारुतीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Maruti Swift

मारुती सुझुकी स्विफ्ट कारदेशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार ठरली आहे. या कारची ऑगस्ट २०२३ मध्ये 18,653 युनिट्सची विक्री झाली आहे. कारच्या विक्रीमध्ये वार्षिक 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपये आहे.

Maruti Baleno

मारुती सुझुकीच्या बलेनो कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक विक्रीमध्ये बलेनो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची एकूण 18,516 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे.

Maruti Wagon R

मारुती सुझुकी Wagon R कारचा सर्वाधिक विक्रीमध्ये तिसरा नंबर आहे. या कारची ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 15,578 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती Wagon R कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे.

Maruti Brezza

मारुती सुझुकीची लोकप्रिय एसयूव्ही कारचा सर्वाधिक कार विक्रीमध्ये चौथा नंबर आहे. या कारची ऑगस्ट २०२३ मध्ये 14,572 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.

Tata Punch

टॉप ५ कार विक्रीमध्ये टाटा मोटर्सच्या पंच एसयूव्ही कारचा देखील समावेश आहे. सर्वाधिक कार विक्रीत पंच पाचव्या स्थानी आहे. या कारची एकूण 14,523 युनिट्स विकले गेले आहेत. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.00 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.