Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top Selling SUVs : देशातील या टॉप 5 SUVs खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी! किंमत 6 लाखांपासून सुरु

टाटा, ह्युंदाई आणि मारुतीच्या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२३ महिन्यात ग्राहकानी एसयूव्ही कारला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसत आहे.

0

Top Selling SUVs : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या शानदार एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली असून अनेकजण नवीन कार खरेदी करताना एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत.

कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारचा विक्रीचा ऑक्टोबर २०२३ मधील अहवाल सादर केला आहे. यामध्ये टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राच्या एसयूव्ही कारला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

टाटा नेक्सॉन Facelift

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टॉप ५ एसयूव्ही विक्रीमध्ये Nexon facelift एसयूव्ही कार नंबर वन राहिली आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये Nexon facelift एसयूव्ही कारची 16,887 युनिट्सची विक्री झाली आहे. तर सप्टेंबर २०२३ मध्ये 15,325 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारच्या विक्रीमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.

मारुती ब्रेझा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक स्वस्त एसयूव्ही कार बाजारात सादर केल्या आहेत. त्यापैकी ब्रेझा एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्रेझा एसयूव्ही कारचा सर्वाधिक विक्रीमध्ये दुसरा नंबर लागला आहे.

ऑक्टोबर २०२३ या महिन्यात ब्रेझा एसयूव्ही कारच्या 15,001 युनिट्सची विक्री झाली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सच्या पंच कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२३ या महिन्याच्या विक्रीमध्ये पंच कारचा तिसरा नंबर लागला आहे. ऑक्टोबर २०२३ या महिन्यात पंच कारची 15,217 युनिट्सची विक्री केली आहे. पंच कारच्या विक्रीमध्य तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.00 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

महिंद्रा कार उत्पादक कंपनीच्या स्कॉर्पिओ एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Scorpio-N आणि Scorpio Classic SUV कारच्या विक्रीमध्ये चांगली वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२३ या महिन्यात स्कॉर्पिओच्या 13,578 युनिट्सची विक्री झाली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.10 लाख रुपये आहे.

ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटा कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. Creta कारची ऑक्टोबर २०२३ या महिन्यामध्ये 13,077 युनिट्सची विक्री झाली आहे. याच कारची सप्टेंबर २०२३ मध्ये 12,717 युनिट्सची विक्री झाली आहे. कारच्या विक्रीमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपये आहे.