Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Top Sports Bikes : TVS आणि Bajaj सह ‘या’ स्पोर्ट बाईक्स खरेदीसाठी तरुणांची मोठी गर्दी! किंमतही 2 लाखांपेक्षा कमी

नवीन स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचा विचार असेल तर अनेक कंपन्यांच्या स्पोर्ट बाईक बाजारात उपलब्ध आहेत. TVS आणि Bajaj सह अनेक कंपनीच्या या बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Top Sports Bikes : देशातील दुचाकी ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या स्पोर्ट बाईक्स उपलब्ध आहेत. तरुणांमध्ये सध्या स्पोर्ट बाईक्स खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. TVS पासून Bajaj पर्यंतच्या अनेक sport बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुम्हीही नवीन आणि स्वस्त खिशाला परवडणारी स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Bajaj ते TVS च्या स्पोर्ट बाईक्स उपलब्ध आहेत. त्यांच्या या बाईक्स लोकप्रिय स्पोर्ट बाईक ठरत आहेत.

TVS Apache RTR 160

TVS कार उत्पादक कंपनीची परवडणारी स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचा विचार असेल तर Apache RTR 160 बाईक उत्तम पर्याय आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.40 लाख रुपये आहे.

बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, राइड मोड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ड्रम आणि डिस्क ब्रेक असे फीचर्स देण्यात येत आहेत. बाईकमध्ये 160cc सिंगल-सिलेंडर दोन-वाल्व्ह एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 15.31 bhp पॉवर आणि 13.9 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

बजाज पल्सर N160

बजाज दुचाकी निर्मात्या कंपनीची पल्सर N160 स्पोर्ट बाईक तरुणांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.56 लाख रुपये आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी हा एक उत्तम स्पोर्ट बाईक पर्याय आहे. बाईकमध्ये एकापेक्षा एक आकर्षक रंग पर्याय देण्यात येत आहेत.

Yamaha MT-15

Yamaha MT-15 स्पोर्ट बाईक देखील अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. MT-15 बाईकची एक्स शोरूम किंमत 1.92 लाख रुपये आहे. बाईकमध्ये सिंगल-चॅनल एबीएस पर्याय देण्यात आला आहे. बाईकला 17 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

KTM RC 200

केटीएम कार उत्पादक कंपनीची RC 200 स्पोर्ट बाईक तुमच्यासाठी उत्तम बाईकचा पर्याय आहे. बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएससह पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 2.14 लाख रुपये आहे.