Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Cars Waiting Period : इनोव्हा, ग्लान्झा, हायराइडर, फॉर्च्युनर खरेदी करण्यासाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा, जाणून घ्या

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आलिशान कारवरील नोव्हेंबर २०२३ मधील प्रतीक्षा कालावधी जाहीर केला आहे. इनोव्हा, ग्लान्झा, हायराइडर, फॉर्च्युनर खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल.

0

Toyota Cars Waiting Period : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या त्यांच्या अनेक आलिशान कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र टोयोटाच्या या आलिशान कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना महिनो प्रतीक्षा करावी लागत आहे.

नोव्हेंबर २०२३ मधील टोयोटाच्या आलिशान कारवरील प्रतीक्षा कालावधी समोर आला आहे. अर्बन क्रूझर हायराइडर आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड सारख्या नवीन कारवर देखील ग्राहकांना १ वर्षापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटा आणि मारुती सुझुकी या दोन कार उत्पादक कंपनीच्या भागीदारीतून अनेक कार सादर करण्यात आल्या आहेत. टोयोटा मारुतीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहे. टोयोटा सध्या अनेक कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करत आहे.

Toyota Fortuner प्रतीक्षा कालावधी

टोयोटा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय लक्झरी फीचर्स Fortuner कार खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. टोयोटा Fortuner खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 4 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुकिंग केल्यापासून पुढील 4 महिन्यात ग्राहकांना Fortuner कारची डिलिव्हरी दिली जात आहे.

Toyota Innova Hycross प्रतीक्षा कालावधी

टोयोटा कार निर्मात्या कंपनीच्या अनेक कार सध्या हायब्रीड तंत्रज्ञान प्रणालीसह बाजारात उपलब्ध आहेत. टोयोटाच्या Innova Hycross हायब्रीड कारला देखील ग्राहकांच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना 12 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आज बुकिंग केल्यांनतर तुम्हाला एक वर्षाने Innova Hycross ची डिलिव्हरी मिळेल.

Toyota Urban Cruiser Hyryder प्रतीक्षा कालावधी

टोयोटा कार उत्पादक कंपनीची Urban Cruiser Hyryder एसयूव्ही कार खरेदीसाठी देखील तुम्हाला १२ महिन्यांपेक्षा जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. या कारमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड इंजिन पर्याय देण्यात येत आहे. Hyryder सीएनजी कारवर सर्वाधिक प्रतीक्षा कालावधी आहे.

Toyota Innova Crysta प्रतीक्षा कालावधी

टोयोटाची लक्झरी फीचर्स आलिशान कार Innova Crysta खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला त्यावरील प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. Innova Crysta कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 8 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कार बुकिंग केल्यानंतर 8 महिन्यांनी कारची डिलिव्हरी मिळेल. प्रत्येक डिलरशिप, व्हेरियंट आणि रंग पर्यायानुसार प्रतीक्षा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो.