Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Crown Sport SUV : टोयोटाने सादर केली स्टायलिश लुकसह आलिशान Crown Sport SUV, पहा कोणते मिळणार नवीन फीचर्स

टोयोटा कार उत्पदक कंपनीची आणखी एक आलिशान कार लवकरच भारतात दाखल केली जाऊ शकते. या कारचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

0

Toyota Crown Sport SUV : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक एसयूव्ही कार भारतात सादर केल्या आहेत. तसेच एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता कंपनीकडून आणखी एक एसयूव्ही कार सादर केली आहे.

टोयोटाची Crown Sport SUV ही एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहे. क्राउन लाइन-अपमधील टोयोटाची ही दुसरी कार आहे. कंपनीकडून या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत.

Crown Sport SUV डिझाईन

Crown Sport ही टोयोटाची ५ सीटर एसयूव्ही कार असणार आहे. या कारला स्पोर्टी आणि स्टायलिश लूक देण्यात आला आहे. कारची लांबी अंदाजे ५ मिमी आणि व्हीलबेस 2.7 मिमी देण्यात येऊ शकतो. कारच्या समोरील बाजूस, बंपरमध्ये मुख्य हेडलॅम्प युनिटसह दुहेरी-स्तरीय नेक देण्यात येणार आहे.

तसेच कारमध्ये C-आकाराचे LED लाईट्स पाहायला मिळतील. टोयोटाकडून नवीन एसयूव्ही कारमध्ये हॅमरहेड शार्क लुक देण्यात येऊ शकतो. कारच्या क्रॉसओव्हर सारख्या डिझाइनची पुष्टी करणारी एक प्रमुख फॉक्स स्किड प्लेट देखील देण्यात येईल. फॉक्स स्किड प्लेट, नंबरप्लेट हाऊसिंग आणि कनेक्टेड टेल-लॅम्प नवीन एसयूव्हीमध्ये पाहायला मिळू शकते.

Crown Sport इंटेरियर

टोयोटाच्या नवीन Crown Sport एसयूव्ही कारमध्ये लेदर आणि पियानो ब्लॅक फिनिशसह नवीन डॅशबोर्ड पाहायला मिळू शकतो. तसेच एसयूव्ही कारमध्ये साउंड-रेग्युलेटिंग सीलिंग तंत्रज्ञान पाहायला मिळू शकते.

Crown Sport इंजिन

Crown Sport एसयूव्ही कारमध्ये टोयोटाकडून 2.4-लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिन दिले जाऊ शकते. हे एक शक्तिशाली इंजिन आहे. त्यामुळे भारतीय ऑटो बाजारात आणखी एक शक्तिशाली इंजिनसह येणारी हायब्रीड कार लवकरच एन्ट्री करू शकते.

Crown Sport कधी लाँन्च होणार?

Crown Sport एसयूव्ही कारचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. टोयोटाने उत्तर अमेरिकन बाजारपेठेत क्राउन हाय-राइडिंग सेडान सादर केली आहे. क्राउन स्पोर्ट एसयूव्ही सध्या फक्त जपानमध्ये विकली जात आहे. लवकरच ही कार भारतात देखील सादर केली जाऊ शकते.