Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Fortuner 2024 : नवीन बदलांसह फॉर्च्युनर पुन्हा होणार लॉन्च ! मिळणार हे खास फीचर्स

0

Toyota Fortuner 2024 : टोयोटा कार उत्पादक कंपनीची भारतीय ऑटो मार्केटमध्ये लोकप्रिय असलेली फॉर्च्युनर एसयूव्ही कार आता पुन्हा एकदा नवीन बदलांसह भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.

टोयोटा कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या फॉर्च्युनर 2024 एसयूव्ही कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल अपेक्षित आहेत. थायलंडमध्ये टोयोटा फॉर्च्युनर 2024 चे काही तपशील उघड झाले आहेत.

Fortuner 2024 मध्ये नवीन काय आहे?

Autocar

नवीन फॉर्च्युनर एसयूव्ही कारला पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंजिन पर्याय मिळेल. सध्या फॉर्च्युनर एसयूव्ही 2.8-लीटर डिझेल इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. 2021मध्ये कारचे इंजिन अधिक शक्तिशाली बनवण्यात आले आहे.

टोयोटा फॉर्च्युनर 2024 – अंतर्गत बदल

नवीन फॉर्च्युनर एसयूव्ही कारमध्ये अनके बदल होऊ शकतात. कारच्या केबिनमध्ये आणखी काही प्रीमियम फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रमाणेच आता 9.0-इंचावर अपग्रेड केले गेले आहे आणि यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले देखील मिळेल.

थायलंडमध्ये टायर मॉनिटरिंग सिस्टम फीचर्स देखील फॉर्च्युनरमध्ये उपलब्ध आहे. नवीन फॉर्च्युनरमध्ये सनरूफ सारखे कोणतेही फीचर्स दिले जाणार नाही.

टोयोटाची योजना

फॉर्च्युनरच्या बाहेरील डिझाईनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मात्र कंपनीकडून फॉर्च्युनर कारला नवीन वर्षात अपग्रेड केले जाऊ शकते.

टोयोटाकडून त्यांच्या कारची विक्री वाढवण्याची नवनवीन एसयूव्ही सादर केल्या जात आहेत. तसेच कंपनीकडून 2024 मध्ये कार्चही उत्पादन क्षमता देखील वाढवली जाणार आहे.

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार कंपनीच्या भागीदारीतून अनेक कार सादर करण्यात आल्या आहेत. टोयोटा मारुती सुझुकी कारवर आधारित त्यांच्या अनेक सादर करत आहे.

सध्या टोयोटा त्यांच्या अनेक नवीन एसयूव्ही कारवर काम करत आहे. टोयोटा कार कंपनीकडून मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कारवर आधारित त्यांची Taisor एसयूव्ही कार सादर करण्याच्या तयारीत आहे.