Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Glanza : 30 किमी मायलेज आणि किंमत 7 लाखांपेक्षा कमी! आजच घरी आणा ‘ही’ हॅचबॅक कार

बाजारात एक अशी कार आहे जिचे 30 किमी मायलेज आणि किंमत 7 लाखांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या फीचर्स.

0

Toyota Glanza : जर तुम्ही कमी किमतीत शानदार फीचर्स असणारी कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. आता तुम्ही Toyota Glanza खूप स्वस्तात खरेदी करू शकता. जिची 7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत आहे. तुम्हाला कारमध्ये मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

पार्किंग सेन्सर्स

कंपनीने आपल्या या कारमध्ये मागील पार्किंग सेन्सर आणि सहा एअरबॅग्ज अशी जबरदस्त सेफ्टी उपलब्ध करून दिली आहेत. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार पेट्रोलवर 22 kmpl मायलेज देत असून यात कोणत्याही लक्झरी कारप्रमाणे 360-डिग्री कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले सारखी शानदार फीचर्स दिली आहेत. या कारमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले दिला आहे.

मिळेल 318 लिटर बूट स्पेस

कंपनीने आपल्या या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले आहेत. ही 5 सीटर हॅचबॅक कार असून ज्यात इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण दिले आहे. इतकेच नाही तर Toyota च्या या कारमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. मोठ्या कुटुंबासाठी 318 लीटरची बूट स्पेस दिली आहे. तसेच या कारमध्ये पाच मोनोटोन रंग उपलब्ध असतील.

5 कलर पर्याय

Toyota ची Glanza कार 90 PS चा पॉवर देत असून यात 5 कलर पर्याय आहेत. किमतीचा विचार केला तर या कारचा टॉप व्हेरियंट 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असून कार 113 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. यात हिल होल्ड असिस्ट फिचर दिले आहे.

5-स्पीड गिअरबॉक्स

कंपनीच्या या कारमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिले आहे. ही कार CNG मध्ये 77.5 PS चा पॉवर देत असून या कारला व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC) आणि ABS फिचर दिले आहेत. यात ISOFIX चाइल्ड सीट अँकर उपलब्ध असून त्यात क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सुविधा असेल. या कारमध्ये व्हॉईस असिस्टन्सचा पर्यायही आहे.