Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Glanza CNG : 30 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 6.81 लाख! घरी आणा टोयोटाची उत्तम कार

टोयोटाची दमदार मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर 30 Kmpl मायलेज देणारी उत्तम हॅचबॅक कार बाजारात उपलब्ध आहे. तसेच कारची किंमत देखील ७ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

0

Toyota Glanza CNG : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण नवीन कार खरेदी करताना दमदार मायलेज देणाऱ्या कारचा पर्याय निवडतात.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर टोयोटाची शानदार हॅचबॅक कार बाजारात उपलब्ध आहे. ही कार 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच कारची किंमत देखील ७ लाखांपेक्षा कमी आहे.

टोयोटाची Glanza हॅचबॅक कार तुमच्यासाठी उत्तम कार आहे. ही कार मारुती सुझुकी बलेनो कारवर आधारित आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.81 लाख रुपये आहे. मात्र ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बुकिंगनंतर प्रतीक्षा करावी लागेल.

टोयोटा Glanza प्रतीक्षा कालावधी

तुम्हालाही टोयोटाची दमदार मायलेज देणारी हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी Glanza कार सर्वोत्तम पर्याय आहे. टोयोटाने ही कार E, S, G आणि G या चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायसह सादर करण्यात आली आहे.

टोयोटा Glanza इंजिन पॉवरट्रेन

टोयोटा Glanza कारमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 89 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारचे सीएनजी मॉडेलचे इंजिन ७६ bhp पॉवर आणि ९८.५ Nm टॉर्क जनरेट करते. Glanza चे सीएनजी मॉडेल 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा Glanza किंमत

टोयोटाची Glanza उत्तम मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.81 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे. ही सीटर कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.