Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Hilux Car Discount : टोयोटाची ही कार आजच करा खरेदी! मिळत आहे तब्बल 6 लाखांची सूट, पहा फीचर्स आणि किंमत

तुम्हीही एक पिकअप कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच टोयोटा हिलक्स पिकअप कार खरेदी करा. कारण टोयोटा कंपनीकडून या कारवर ६ लाखांची सूट दिली जात आहे.

0

Toyota Hilux Car Discount : टोयोटो कंपनीच्या कार भारतीय ऑटो बाजारात ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच कंपनीकडून कार खरेदीवर ग्राहकांना सूट देखील दिली जात आहे.

सध्या टोयोटा कंपनीकडून त्याच्या पिकअप ट्रक हिलक्सवर मोठी सूट दिली जात आहे. हिलक्स कार्व्हर कंपनीकडून ६ लाखांची सूट दिली जात आहे. मात्र जर तुम्हाला कारवरील सूट मिळवायची असेल तर त्या कारचे स्टँडर्ड व्हेरिएंट खरेदी करावे लागेल.

हिलक्स पिकअप कारचे एकूण तीन व्हेरिएंट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. स्टँडर्ड मॅन्युअल, हाय मॅन्युअल आणि हाय ऑटोमॅटिक असे तीन व्हेरिएंट कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहेत.

टोयोटा कंपनीची हिलक्स पिकअप कार थेट इसुझू व्ही-क्रॉसला टक्कर देते. टोयोटाच्या हिलक्स पिकअप कारची एक्स शोरूम किंमत 37.15 लाख रुपये आहे तर इसुझू व्ही-क्रॉसची एक्स शोरूम किंमत 23.50 लाख रुपयांपासून सुरु होते. म्हणजे या दोन्ही कंपनीच्या कारच्या किमतीमध्ये तब्बल 13.65 लाख रुपयांचा फरक आहे.

भारतीय बाजारपेठेत अशा कारला कमी मागणी आहे मात्र उत्तर अमेरिकन बाजारपेठेत पिकअप कारची मागणी अधिक आहे. या पिकअप कारमध्ये तुम्हाला सामान घेऊन जाण्यासाठी मोठी जागा म्हणजेच जास्त बूट स्पेस देण्यात येतो.

टोयोटा हिलक्स पिकअप कारचे बाहेरील डिझाईन

भारतीय बाजारपेठेत अशा पिकअप कारला मागणी जरी कमी असली तरी या कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात येतात. Hilux ला डबल-कॅब बॉडी स्टाईल देण्यात येत आहे.

पुढील बाजूस हेक्सागोनल क्रोम ग्रिल आणि स्वेप्ट-बॅक एलईडी हेडलॅम्प्स, आकर्षक अलॉय व्हील्स, साइड स्टेप्स, बॉडी क्लेडिंग देण्यात आले आहे. त्यामुळे कारचा लूक अतिशय उत्कृष्ट दिसत आहे.

तसेच कारच्या पाठीमागच्या बाजूला तुमचे सामान ठेवण्यासाठी खूप मोठी जागा देण्यात येते. ही कार एकूण ५ रंगामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमोशनल रेड, व्हाईट पर्ल शाइन, सिल्व्हर मेटॅलिक, ग्रे मेटॅलिक आणि सुपर व्हाइट अशा रंग पर्यायांमध्ये ही कार ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टोयोटा हिलक्स पिकअप कारचे इंटिरियर डिझाईन

कारच्या इंटिरियर डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहे, जी Apple CarPlay आणि Android CarPlay ला सपोर्ट करते.

टोयोटा हिलक्स पिकअप कारमध्ये लेदर सीट अपहोल्स्ट्री, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, माउंटेड कंट्रोल्ससह स्टीयरिंग व्हील, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा असे फीचर्स देण्यात येत आहेत. या कारमध्ये 470 लिटरपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.