Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

आजच घरी आणा ‘ही’ जबरदस्त कार! होणार बंपर बचत; मिळत आहे लाखोंचा डिस्काउंट, जाणून घ्या तपशील। Toyota Hilux Offers

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक मस्त आणि बेस्ट पिकअप ट्रक खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  काही डीलर्स Toyota Hilux वर तब्बल 6 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत.

0

Toyota Hilux Offers:  तुम्ही तुमच्यासाठी शक्तिशाली पिकअप ट्रक खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात लोकप्रिय कार कंपनी असणारी टोयोटा मोटर्सच्या शक्तिशाली पिकअप ट्रक Toyota Hilux वर एक बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक मस्त आणि बेस्ट पिकअप ट्रक खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  काही डीलर्स Toyota Hilux वर तब्बल 6 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत.

तर काही डीलर्स काही व्हेरियंटवर 8 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि बाजारात उत्तम फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन तसेच दमदार मायलेजसह  Toyota Hilux विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला मग जाणून घेऊया Toyota Hilux च्या इंजिन, फीचर्स आणि किमतीबद्दल संपूर्ण माहिती.

Toyota Hilux  इंजिन

कंपनीने आपल्या Hilux मध्ये 2.8 लीटर 4 सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनला देखील जोडलेले आहे. यासोबतच हे इंजिन मजबूत पॉवर जनरेट करण्यासही सक्षम आहे.

Toyota Hilux फीचर्स

आता त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने लेदर सीट्स, ड्युअल झोन पूर्णपणे ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, स्मार्ट एंट्री, ऑटो हेड लॅम्प, 8 इंच इंफोटेनमेंट टेबल स्टाइल स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल क्लॉक, डिजिटल स्पीडोमीटर तसेच ओडोमीटर, पॉवर विंडो, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील देखील देण्यात आले आहेत.

यासोबतच 7 SRS एअरबॅग्ज, व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल,  ट्रॅक्शन कंट्रोल, उत्तम नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टिम , टायर अँगल मॉनिटर, फ्रंट पार्किंग सेन्सर, पॉवर आणि इको ड्रायव्हिंग मोड आणि 4X4 सारखी सुरक्षा फीचर्स देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Toyota Hilux  किंमत

टोयोटा मोटर्सने या शक्तिशाली पिकअप ट्रकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 30.40 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 37.90 लाख रुपयांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पिकअप ट्रक खरेदी करण्याचा विचार करत असाल  तर तुम्हाला टोयोटा मोटर्सकडून ही उत्तम पिकअप चांगल्या सवलतीत मिळू शकते. यासोबतच हे तुम्हाला सुमारे 15 ते 17 किमीचे मायलेज देण्यासही सक्षम आहे.