Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

बंपर डिस्काउंट ऑफर! टोयोटाची ‘ही’ दमदार एसयूव्ही मिळत आहे तब्बल 8 लाखांनी स्वस्त। Toyota Hilux

लोकप्रिय ऑटो कंपनी टोयोटाच्या एका मस्त ऑफरचा फायदा घेत तब्बल  8 लाखांची बचत करून तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

0

Toyota Hilux : भारतीय ऑटो बाजारात सध्या एकापेक्षा एक मस्त मस्त बंपर डिस्काउंट ऑफर पाहायला मिळत आहे. ज्याच्या फायदा घेत ग्राहक अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फिचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या कार्स घरी आणत आहे.

यातच जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लोकप्रिय ऑटो कंपनी टोयोटाच्या एका मस्त ऑफरचा फायदा घेत तब्बल  8 लाखांची बचत करून तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतीय ऑटो बाजारात टोयोटा आपल्या हिलक्स पिकअप ट्रकवर बंपर सवलत देत आहे. जर तुम्ही हा ट्रक विकत घेतला तर तुम्हाला या लाइफस्टाइल ट्रकवर 6 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट मिळू शकते.

टोयोटाचा हा लाइफस्टाइल ट्रक 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या प्रीमियम व्हेरियंटवर 6 ते 8 लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. हा व्हेरियंट गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता आणि त्याची सुरुवातीची किंमत 33.99 लाख रुपये आहे. ट्रकला जास्त मागणी गेल्या वर्षी लॉन्च झाल्यानंतर कंपनीने यासाठी बुकिंग सुरू केले होते. प्रचंड मागणीमुळे कंपनीने बुकिंग थांबवले होते. यानंतर, 2023 मध्ये, कंपनीने यासाठी पुन्हा बुकिंग घेणे सुरू केले.

कंपनीने त्याची किंमतही बदलली आहे. मार्च 2022 नंतर त्याच्या विक्रीतही घट दिसून आली. त्यामुळे कंपनी आता सवलत देऊन त्याची विक्री करत आहे. लाइफस्टाइल पिकअप ट्रक भारतात 30-35 टक्के स्थानिक पातळीवर असेम्बल होतात. किमतीच्या सुधारणेसह, एंट्री-लेव्हल स्टँडर्ड MT व्हेरियंटची किंमत रु. 3.59 लाख कमी होते, एंट्री-लेव्हल किंमत रु. 30.40 लाखांपर्यंत पोहोचते.

दुसरीकडे टोयोटाने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असलेल्या अधिक प्रीमियम हाय व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. मॅन्युअलच्या किंमतीत रु. 1.35 लाखांची वाढ झाली आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरियंटला रु. 1.10 लाखांची वाढ मिळाली आहे.