Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Hyryder CNG : टोयोटा Hyryder CNG खरेदी करणार असाल तर वाचा बातमी, खरेदी करण्याआधी बदलेल तुमचाही विचार

टोयोटाची अल्पवधीच लोकप्रिय झालेली Hyryder एसयूव्ही कारचे सीएनजी व्हेरियंट खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

0

Toyota Hyryder CNG : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक आलिशान कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टोयोटाच्या या लक्झरी फीचर्स कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टोयोटा कारच्या मागणीत प्रचंड वाढ देखील झाली आहे.

टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. मात्र कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता कंपनीकडे तेवढे उत्पादन प्लांट नाहीत. उत्पादन कमी असल्याचे कारचा पुरवठा देखील कमी होत आहे. त्यामुळे ग्राहकांना टोयोटाच्या कार खरेदी करण्यासाठी महिनो प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटा कार कंपनीने त्यांची जबरदस्त एसयूव्ही Urban Cruiser Hyryder बाजारात सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये हायब्रीड आणि सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर या दोन कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केल्या जात आहेत. टोयोटा हायरायडर एसयूव्हीच्या सीएनजी कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. कारचे सीएनजी व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १ वर्षापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे.

Hyryder CNG प्रकाराचे मायलेज

टोयोटा Hyryder एसयूव्ही कार पेट्रोल, हायब्रीड आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये 26.6 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे ग्राहकांचा सीएनजी व्हेरियंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Toyota Urban Cruiser Hyryder CNG प्रतीक्षा कालावधी

तुम्हालाही Hyryder एसयूव्ही कारचे सीएनजी मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागेल. या महिन्यात तुम्ही कार बुकिंग केली तर तुम्हाला 14 ते 15 महिने प्रतीक्षा करावी लागेल.

टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder किंमत

टोयोटाने त्यांच्या अनेक कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Hyryder एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.86 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे.