Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Innova Hycross : टोयोटा कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ! Innova Hycros खरेदी करण्यासाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा

टोयोटाच्या कार खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली असून उत्पादन क्षमता कमी झाली आहे.

0

Toyota Innova Hycross : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक आलिशान कार सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र टोयोटाच्या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटा कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत असताना कारच्या उत्पादन क्षमतेमध्ये कोणतीही वाढ कंपनीकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना कार खरेदीसाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटाची आलिशान Innova Hycros कार खरेदी करायची असेल तर ग्राहकांना 14 ते 15 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने कंपनीकडून Innova Hycros कारचे ZX आणि ZX(O) व्हेरियंटचे बुकिंग बंद केले आहे. काही काळानंतर कंपनीकडून या कारचे बुकिंग पुन्हा सुरु केले जाणार आहे.

टोयोटा Innova Hycros किंमत

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कारमध्ये लक्झरी फीचर्स दिले आहेत. Innova Hycros कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 29.62 लाख रुपये आहे. कंपनीकडून या कारचे पाच व्हेरियंट हायब्रिडमध्ये विकले जात आहे. कारमध्ये 6 एअरबॅगसह ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस डिझाईन

टोयोटाच्या इनोव्हा हाय क्रॉसचा जबरदस्त लूक ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहे. कारमध्ये चंकी बंपर, हनीकॉम्ब मेश ग्रिल, स्लीकर हेडलॅम्प्स आणि अपराइट प्रोफाइल, मोठे 18-इंच अलॉय, पातळ बॉडी क्लॅडिंग, टेपरिंग रूफ, 100 मिमी लांब व्हीलबेस, रॅपराउंड एलईडी टेल लाईट्स देण्यात आले आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंजिन

टोयोटाकडून त्यांची इनोव्हा हायक्रॉस कार दोन इंजिनसह सादर केली आहे. कारमध्ये पहिले 2.0-लिटर पेट्रोल इंजिन जे 174PS पॉवर आणि 205Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन CVT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. तर दुसरे 2.0-लिटर मजबूत हायब्रिड इंजिन देण्यात आले जे 113 PS मोटरसह 152 PS टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. Innova Hycross कार 21.1 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस इंटिरियर

इनोव्हा हाय क्रॉस कारच्या केबिनमध्ये 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे जी वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते.

तसेच कारमध्ये JBL साउंड सिस्टीम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अॅडजस्टेबल कॅप्टन सीट्स, ड्युअल 10-इंच रीअर टचस्क्रीन सिस्टीम, ADAS वैशिष्ट्ये, अॅम्बियंट लाइटिंग आणि सनरूफ देण्यात आले आहे.