Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Land Hopper SUV : टोयोटाची मोठी घोषणा! लॉन्च करणार जबरदस्त ऑफ-रोडिंग SUV, किंमत फक्त

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच कंपनीची जबरदस्त ऑफ-रोडिंग SUV ऑटो मार्केटमध्ये दाखल होणार आहे.

0

Toyota Land Hopper SUV : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक लक्झरी फीचर्स आलिशान एसयूव्ही कार सादर करण्यात आल्या आहेत. आता टोयोटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कंपनीकडून शानदार शक्तिशाली ऑफ-रोडिंग SUV कार सादर केली जाणार आहे.

टोयोटाकडून या ऑफ रोडिग एसयूव्ही कारचे नाव लँड हॉपर असे असू शकते. तसेच टोयोटा या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देऊ शकते. ही कार बाजारात येताच अनेक एसयूव्हीशी स्पर्धा करू शकते. भारतात ही कार सादर केल्यानंतर महिंद्रा थार ऑफ रोडींग एसयूव्ही करशी टक्कर देऊ शकते.

तुम्हालाही ऑफ रोडींग एसयूव्ही कार चालवण्याचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही टोयोटाची आगामी ऑफ रोडींग एसयूव्ही कार खरेदी करू शकता. या कारची किंमत देखील कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

टोयोटा लँड हॉपर

नुकत्याच लॉन्च झालेल्या लँड क्रूझर प्राडो प्रमाणेच उत्तर अमेरिकन मार्केटमध्ये याला लँड क्रूझर 250 म्हणून ओळखले जाईल. टोयोटाची आगामी एसयूव्ही जपानमध्ये लँड हॉपर या नावाने लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टोयोटा लँड हॉपर डिझाइन आणि पॉवरट्रेन

टोयोटा कार कंपनी आगामी कॉम्पॅक्ट क्रूझरसह त्याच्या EV मॉडेल्स सादर करण्याची शक्यता आहे. कारचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये बॉक्सी आणि सरळ डिझाईन दिसत आहे. मात्र या आगामी एसयूव्हीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या SUV मध्ये C-shaped लाइट सिग्नेचर समोर दिसू शकते.

टोयोटाच्या आगामी लँड हॉपर एसयूव्हीचा आकार कोरोला क्रॉस सारखा असण्याची शक्यता आहे. ही एसयूव्ही कार 4.4 मीटर लांब असण्याची शक्यता आहे. टीझरमध्ये, टेलगेटवर एक अतिरिक्त व्हील बसवल्याने दिसून येत आहे. ही कार टोकियोमध्ये या वर्षाच्या अखेरीस सादर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.