Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion CNG : एर्टिगा नाही तर टोयोटाची ही स्वस्त ७ सीटर CNG कार खरेदीसाठी ग्राहकांनी केली गर्दी, किंमतही खूपच कमी…

टोयोटाची मारुती सुझुकी एर्टिगावर आधारित सादर करण्यात आलेली ७ सीटर सीएनजी कारचे बुकिंग कंपनीकडून थांबवण्यात आले आहे. ग्राहकांचा या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Toyota Rumion CNG : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित ७ सीटर कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांची या कारला मागणी पाहता टोयोटाकडून कारचे बुकिंग थांबवण्यात आले आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी कार खरेदी करण्यासाठी महिन्यांची प्रतीक्षा लागत आहे. त्यामुळे नुकतीच मारुती एर्टिगावर सादर करण्यात आलेली टोयोटाची Rumion सीएनजी कारला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

बुकिंग कधी सुरू होईल?

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून Rumion CNG कारचे बुकिंग थांबावले आहे. कंपनीकडून या कारसाठी आलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कारचे बुकिंग थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच कंपनीकडून बुकिंग सुरु केले जाईल सांगण्यात आले आहे.

टोयोटा Rumion CNG किंमती

टोयोटा Rumion कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे. ही कार एकूण 6 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये AT, S MT, V MT, G MT, S MT CNG आणि V AT अशा व्हेरियंटचा समावेश आहे.

मारुती अर्टिगाला स्पर्धा देते

टोयोटाची Rumion कार मारुती एर्टिगावर आधारित आहे. या कारमध्ये एर्टिगा ७ सीटर कारसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून कारवर 3 वर्षे/1,00,000 किमीची मानक वॉरंटी देण्यात येत आहे. ही वॉरंटी जी 5 वर्षे/2,20,000 किमी पर्यंत वाढवली जाऊ शकते. टोयोटाची Rumion कार मारुती सुझुकी एर्टिगाला टक्कर देते.

टोयोटा Rumion वैशिष्ट्ये

टोयोटा Rumion कारमध्ये इनोव्हा क्रिस्टल सारखी ग्रिल आणि नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आले आहे. कारमध्ये ड्युअल-टोन कलर फिनिशसह आणि फॉक्स वुड इन्सर्टसह डॅशबोर्डसह, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तसेच ऑटोमॅटिक एसी, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि 4 एअरबॅगसह इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.