Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion : एर्टिगाची डुप्लिकेट Rumion कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा! कंपनीने बंद केले बुकिंग

टोयोटाची Rumion कार खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाह्यला मिळत आहे. कारच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने कंपनीने कारचे बुकिंग बंद केले आहे.

0

Toyota Rumion : मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक या दोन कंपन्यांच्या भागीदारीतून भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनके नवीन कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टोयोटा कार उत्पादक कंपनीने मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित त्यांची Rumion ७ सीटर कार सादर केली आहे. या कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एर्टिगा ७ सीटर कारसारखेच फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Rumion कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय दिले आहेत. मात्र Rumion कारच्या सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कंपनीला या कारचे बुकिंग देखील बंद करावे लागले आहे. कंपनीकडून काही दिवसांसाठी हे बुकिंग थांबवण्यात आले आहे.

टोयोटा Rumion किंमत

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून Rumion ७ सीटर फॅमिली कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10,29,000 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13,68,000 लाख रुपये आहे. कारच्या सीएनजी व्हेरियंटला मोठी मागणी आहे.

Toyota Rumion पेट्रोल प्रतीक्षा कालावधी

टोयोटाची नवीन Rumion ७ सीटर कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 5 ते 6 महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. डिसेंबर 2023 मध्ये बुकिंग झाल्यापासून या 7-सीटर पेट्रोल MPV वर 6 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.

टोयोटा Rumion इंजिन

टोयोटाने Rumion MPV कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह दिले आहे. हे इंजिन 103 ps पॉवर आणि 137 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

टोयोटा Rumion मायलेज

टोयोटा Rumion कारचे पेट्रोल MT व्हेरियंट 20.51 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर पेट्रोल AT व्हेरियंट 20.11 Kmpl मायलेज देते. Rumion कारचे सीएनजी व्हेरियंट २६.११ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा Rumion वैशिष्ट्ये

Rumion ७ सीटर कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करणारी 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, पॅडल शिफ्टर्स, इंजिन पुश बटण स्टार्ट-स्टॉप, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि क्रूझ कंट्रोल अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.