Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion : एर्टिगाच्या डुप्लिकेट ७ सीटर कारची ग्राहकांना भुरळ! देते 26 Kmpl मायलेज, पहा किंमत

तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसाठी उत्कृष्ट फीचर्स ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर टोयोटाने अलीकडेच सादर केलेली MPV कार उत्तम पर्याय आहे. ग्राहकांचा या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Toyota Rumion : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित त्यांची नवीन ७ सीटर कार सादर केली आहे. टोयोटाने लाँच केलेल्या ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

टोयोटा कार उत्पादक कंपनी आणि मारुती सुझुकी यांच्या भागीदारीतून अनेक नवीन कार सादर करण्यात येत आहेत. टोयोटाने मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित त्याची Rumion ७ सीटर कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टोयोटा Rumion कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ झाली आहे. बाजारात या कारला चांगलंही मागणी आहे. कारचा प्रतीक्षा कालावधी १८ महिन्यांपर्यंत गेला आहे.

टोयोटा Rumion खरेदीसाठी इतकी प्रतीक्षा करावी लागणार

टोयोटाकडून सादर करण्यात आलेल्या Rumion कार खरेदीसाठी ग्राहकांचा एक वर्षापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे. Rumion कारचे पेट्रोल व्हेरियंट (NEO DRIVE) खरेदीसाठी ग्राहकांना 5 ते 6 महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच या कारचे सीएनजी मॉडेल खरेदीसाठी 16-18 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने Rumion कारच्या CNG व्हेरियंटचे बुकिंग बंद केले आहे.

टोयोटा Rumion किंमत

टोयोटा कार उत्पादक कंपनी त्यांच्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये शानदार कार उपलब्ध करून देता आहे. Rumion ७ सीटर कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे.

Rumion व्हेरियंट आणि इंजिन

टोयोटाकडून Rumion ७ सीटर कार ४ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. E, S, G आणि V हे चार व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये ७ लोक आरामात प्रवास करू शकतात. कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 103 ps पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Rumion ७ सीटर MPV कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कारचे इंजिन सीएनजी मोडमध्ये 88 ps पॉवर आणि 121.5 nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Rumion कारचे पेट्रोल MT व्हेरियंट 20.51 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर पेट्रोल AT व्हेरियंट 20.11 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच Rumion चे सीएनजी व्हेरियंट 26.11 Kmpl मायलेज देते.

Rumion वैशिष्ट्ये

Rumion MPV कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करणारी 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक एसी, इंजिन पुश बटण स्टार्ट-स्टॉप, क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

तसेच Rumion ७ सीटर कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 4 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ESP, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, रियर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा असे फीचर्स दिले आहेत.