Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion : एर्टिगाची डुप्लिकेट कार खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी! देते 26 Kmpl मायलेज , टोयोटाने बंद केले बुकिंग…

टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीतून अनेक कार भारतात सादर करण्यात आल्या आहेत. या कारला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एर्टिगाच्या डुप्लिकेट कारचे टोयोटाकडून बुकिंग बंद करण्यात आले आहे.

0

Toyota Rumion : टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट 2023 मध्ये मरूउटी सुझुकी एर्टिगा कारवर आधारित त्यांची शानदार ७ सीटर कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच आता कंपनीकडून या कारचे बुकिंग बदन करण्यात आले आहे.

टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीतून अनेक कार सादर करण्यात आल्या आहेत. तसेच या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित टोयोटाने Rumion कार सादर केली आहे.

7-सीटर Rumion MPV कार E, S, G आणि V व्हेरियंटसह 5 रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारच्या बुकिंगमध्ये प्रचंड वाढ झाल्याने कंपनीला कारचे बुकिंग बंद करावे लागले आहे.

एर्टिगा कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एर्टिगाची डुप्लिकेट Rumion कारकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. Rumion कारच्या बुकिंगमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने कंपनीने कारचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Toyota Rumion प्रतीक्षा कालावधी

टोयोटाच्या Rumion MPV कारचा प्रतीक्षा कालावधी देखील भरपूर वाढला आहे. Rumion कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर ३ ते ४ महिने प्रतीक्षा करावी लागू शकते आणि Rumion कारचे सीएनजी व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 18 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने बुकिंग थांबवण्यात आले आहे.

Rumion वैशिष्ट्ये

Rumion ७ सीटर कारमध्ये वायरलेस मोबाइल कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, ऑडिओ आणि कॉलिंगसाठी स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सेकंड रो एसी व्हेंट्स आणि टोयोटा आय-कनेक्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी Rumion ७ सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहे.

Rumion इंजिन पॉवरट्रेन आणि मायलेज

टोयोटा कार कंपनीकडून Rumion ७ सीटर कारमध्ये 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर पेट्रोल-CNG इंजिन पर्याय दिला आहे. या कारचे पेट्रोल इंजिन 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते तर सीएनजीमध्ये या कारचे इंजिन 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

सीएनजी व्हेरियंट 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर करण्यात येत आहे तर पेट्रोल व्हेरियंटला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क गिअरबॉक्स देण्यात येत आहे. Rumion कारचे पेट्रोल व्हेरियंट 20.51 kmpl आणि सीएनजी व्हेरियंट 26.11km/kg मायलेज देते.