Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion : एर्टिगाची डुप्लिकेट Rumion ला ग्राहकांची प्रचंड मागणी! पहा एर्टिगापेक्षा किती आहे महाग

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Rumion ७ सीटर कार गेल्या काही दिवसांपूर्वी सादर केली आहे. या कारच्या बुकिंगला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

0

Toyota Rumion : मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या भागीदारीतून अनेक कार सादर केल्या जात आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टोयोटाने मारुती सुझुकी एर्टिगा कारच्या आधारवर Rumion ७ सीटर कार सादर केली आहे.

टोयोटाच्या या फॅमिली कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. Rumion सीएनजी कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सीएनजी कारचे सर्वाधिक बुकिंग आल्याने कंपनीने बुकिंग थांबवले आहे.

Toyota Rumion किंमत किती आहे?

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्याच्या अनेक ७ सीटर कार सादर केल्या जात आहेत. तसेच त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र टोयोटाच्या कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. टोयोटा Rumion सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 11.24 लाख रुपये आहे.

टोयोटाने Rumion MPV कार सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10 लाख 29 हजार रुपयांमध्ये सादर केली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे. ही कार केवळ ११ हजार रुपये भरून बुकिंग केली जाऊ शकते. ही कार तुम्ही जवळच्या डिलरशिप किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकतात.

एकूण 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध

टोयोटाने त्यांची Rumion MPV कार एकूण ३ व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. S, G आणि V या व्हेरियंटचा यामध्ये समावेश आहे. या तीनही व्हेरियंटच्या किमती वेगवेगळ्या आहेत. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय मिड-व्हेरियंट G मध्ये देण्यात आला नाही. सीएनजी मॉडेल फक्त S व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Ertiga पेक्षा किती महाग?

मारुती सुझुकी Ertiga या ७ सीटर कारपेक्षा Rumion MPV कार 50,000 ते Rs 60,000 रुपयांनी महाग आहे. किंमत जरी जास्त असली तरी ते अधिक चांगल्या मानक वॉरंटीसह ऑफर करण्यात आली आहे. Rumion MPV कारच्या सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांची मागणी जास्त आहे. टोयोटा 3 वर्षे/1,00,000 किमीची मानक वॉरंटी देत ​​आहे, जी 5 वर्षे/2,20,000 किमी पर्यंत वाढवता येते.