Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Rumion : मारुती आणि टोयोटाची जुगलबंदी! लॉन्च करणार शक्तीशाली पॉवरट्रेन आणि जबरदस्त फीचर्स असणारी MPV कार

टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीतून आता आणखी एक कार भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय ग्रहांना आणखी एक MPV कारचा पर्याय मिळणार आहे.

0

Toyota Rumion : देशातील सर्वात मोठी कार निर्माता आणि सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी आणि टोयोटा कंपनीने भागीदारी केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीनंतर अनेक जबरदस्त नवीन कार लॉन्च करण्यात आल्या आहेत.

टोयोटा आणि मारुती सुझुकी कंपनीकडून अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. या दोन्ही कंपन्यांकडून एकमेकांचे तंत्रज्ञान वापरून विविध कार सादर केल्या जात आहेत. आता टोयोटा कंपनीकडून त्यांची आणखी एक स्वस्त MPV कार सादर करणार आहे.

टोयोटा कंपनीकडून त्यांची स्वस्तातील Rumion ही MPV कार भारतात लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच भारतीय ग्राहकांना टोयोटा कंपनीकडून आणखी एक नवीन MPV कार मिळणार आहे.

सर्वात स्वस्त एसयूव्हीमध्ये शक्तिशाली वैशिष्ट्ये

टोयोटा कंपनीकडून मारुती सुझुकी कंपनीच्या भागीदारीतून एर्टिगावर आधारित Rumion ही MPV कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची टोयोटा कंपनीच्या इनोव्हा हायक्रॉसवर आधारित Invicto सादर केली आहे.

सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू होईल

टोयोटा कंपनीकडून त्यांची आगामी चौथी MPV कार भारतात सप्टेंबर 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. टोयोटाची ही एक ७ सीटर कार असणार आहे. सध्या टोयोटाची Rumion ही MPV कार जागतिक बाजारपेठेत विकली जात आहे.

टोयोटाची भारतातील ही चौथी MPV कार असणारा आहे. या अगोदर कंपनीने भारतात इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर या MPV कार लॉन्च केल्या आहेत. आता लवकरच आणखी एक MPV कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे.

कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन

टोयोटाकडून Rumion या MPV कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 103 hp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकते असा दावा करण्यात येत आहे. कंपनीकडून या कारच्या किंमत, फीचर्स आणि लॉन्च तारखेबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Rumion कारची सीएनजी आवृत्ती देखील सादर केली जाईल

टोयोटा कंपनीकडून त्यांच्या आगामी Rumion कारमध्ये सीएनजी पर्याय देखील दिला जाऊ शकतो. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये ही कार ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते. या कारची एक्स शोरूम किंमत 9 लाख असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.