Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Upcoming Car 2024 : Ertiga, Creta आणि Scorpio ची क्रेझ होणार कमी! टोयोटाची जबरदस्त नवीन एसयूव्ही करणार राज्य, पहा फीचर्स आणि किंमत

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो बाजारात जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेली शानदार एसयूव्ही सादर केली जाणार आहे. ही कार मारुती एर्टिगाला टक्कर देऊ शकते.

0

Toyota Upcoming Car 2024 : देशातील ऑटो मार्केटचा विस्तार झपाट्याने वाढू लागला आहे. त्यातच अनेक कंपन्यांकडून नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु आहे. येत्या काळात आणखी नवीन एसयूव्ही लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत.

नवीन कार खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर अनेकजण मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. मारुती सुझुकीची एर्टिगा ही सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार आहे. मात्र ही कार खरेदीसाठी ग्राहकांना खूप प्रतीक्षा करावी लागत आहे.

त्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे

मात्र आता तुम्हाला मारुती एर्टिगासाठी जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण टोयोटा 2024 मध्ये त्यांची जबरदस्त नवीन एसयूव्ही Rush लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून या कारच्या लॉन्चची तारीख उघड केलेली नाही. ही कार जागतिक बाजारपेठेत विकली जात आहे. मात्र आता भारतात देखील लवकरच दाखल होऊ शकते.

Toyota Rush इंजिन

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Rush ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल 4 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 104 PS पॉवर आणि 136 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही एक 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार आहे. Rush एसयूव्ही कार मारुती एर्टिगा, ह्युंदाई क्रेटा, रेनॉल्ट डस्टर आणि स्कॉर्पिओशी स्पर्धा करते.

Rush SUV डायमेन्शन

Rush SUV ही एक ७ सीटर कार असणार आहे. कारचे वजन 1300 किलो असेल. कारची रुंदी 1695 मिमी, रुंदी 4435 मिमी आणि उंची 1705 मिमी देण्यात आली आहे. कारला व्हीलबेस 2685 मिमी देण्यात आला आहे. कारमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि मोठी ग्रील असेल.

कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल डिस्प्ले, माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, रिअर पार्किंग कॅमेरा आणि 16 इंची आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आल्या आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टोयोटाकडून Rush SUV कार एकूण चार व्हेरियंटमध्ये सादर केली जाऊ शकते. E, S, G आणि V या व्हेरियंटमध्ये ही कार सादर करण्याच्या तयारीत टोयोटा असल्याचे बोलले जात आहे. ही कार सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपयांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून अद्याप या कारच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.