Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Upcoming SUV : Thar, Jimny चे टेन्शन वाढणार! टोयोटा लॉन्च करणार जबरदस्त ऑफ रोडींग SUV

टोयोटाकडून त्यांची नवीन ऑफ रोडींग एसयूव्ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह उत्कृष्ट फीचर्स दिले जाऊ शकतात.

0

Toyota Upcoming SUV : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. सध्या टोयोटाच्या अनेक आलिशान कार भारतात लॉन्च करण्यात आल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुम्हालाही ऑफ रोडींग एसयूव्ही कारचा शौक असेल तर तुमच्यासाठी टोयोटाची नवीन एसयूव्ही कार उत्तम पर्याय ठरू शकते. या कारमध्ये थार आणि जिमनी कारपेक्षा जबरदस्त फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही कारच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टोयोटाकडून लँड हॉपर नावाने ट्रेडमार्क केला आहे. टोयोटा कंपनीकडून मिनी एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. टोयोटाने लँड क्रूझर 250 सिरीजवर आधारित नवीन मिनी ऑफ-रोडर एसयूव्ही सादर केली जाणार आहे.

ही कार अमेरिका आणि जपान सारख्या इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वात प्रथम सादर केली जाईल. टोयोटाची ही एक ऑफ रोडींग एसयूव्ही कार असणार आहे. टोयोटाची नवीन एसयूव्ही कार महिंद्रा थार आणि मारुती सुझुकी जिमनीशी स्पर्धा करेल.

पुढील वर्षी येण्याची अपेक्षा आहे

टोयोटाकडून त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही कार हायब्रिड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. भारतात ही कार पुढील वर्षी लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाइट क्रूझर किंवा यारिस क्रूझर असे नवीन एसयूव्ही कारला नाव दिले जाऊ शकते. कारचे डिझाईन देखील आकर्षक बनवण्यात आले आहे.

टोयोटाच्या आगामी एसयूव्ही कारचे डायमेंशन

टोयोटा कार उत्पादक कंपनीची नवीन एसयूव्ही जिमनी पेक्षा आकाराने मोठी असू शकते. कारची लांबी 4,350 मिमी, रुंदी 1,860 मिमी आणि उंची 1,880 मिमी असू शकते. टेलगेटवर लावलेल्या स्पेअर व्हीलसह वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प देण्यात येतील.

थार आणि जिमनीच्या अडचणीत होणार वाढ

टोयोटाच्या नवीन ऑफ रोडींग एसयूव्ही कारमध्ये कोरोला क्रॉसचे 2.0-लिटर पेट्रोल इंजिन, RAV4 चे 2.5-लीटर पेट्रोल/हायब्रिड इंजिन किंवा प्राडो आणि हिलक्ससारखे 2.8-लिटर टर्बोचार्ज केलेले 4-सिलेंडर डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. माईल्ड-हायब्रीड सिस्टीमही कारमध्ये जोडले जाऊ शकते.