Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Vellfire : टोयोटाच्या या आलिशान कारला ग्राहकांची प्रचंड मागणी! मिळतात लक्झरी फीचर्स, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या प्रतीक्षा कालावधी

टोयोटाकडून नेहमीच लक्झरी आकार सादर तसेच या कार खरेदीसाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. टोयोटाच्या एका आलिशान कारला ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे दिसत आहे.

0

Toyota Vellfire : भारतातील सर्वात लोकप्रिय कार निर्माता कंपनी टोयोटाने नुकतीच आपली आलिशान कार बाजारात दाखल केली आहे. कंपनीची ही कार 2024 मध्ये येणाऱ्या नवीन मर्सिडीज-बेंझ व्ही क्लासशी जोरदार स्पर्धा करेल. कंपनीने यात अनेक शानदार फीचर्स दिले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. ही कार मर्यादित संख्येत तयार केली जाते. त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. जर तुम्ही टोयोटाची ही लक्झरी कार खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी जाणून घ्या.

Toyota Vellfire ची किंमत

किमतीचा विचार केला तर Toyota Vellfire ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 1.20 कोटी रुपयांपासून सुरू आहे. ही लक्झरी MPV VIP ग्रेड आणि उच्च रेंजमध्ये येते. कंपनीकडून ही कार तीन बाह्य रंग पर्यायांमध्ये ऑफर केली आहे. या महिन्यामध्ये नवीन MPV खरेदी करणाऱ्यांना वितरणासाठी 14 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी देण्यात येत आहे. हे लक्षात ठेवा की डीलरशिप, स्थान आणि व्हेरियंटनुसार प्रतीक्षा कालावधी बदलेल.

जाणून घ्या Toyota Vellfire चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Toyota ची ही शानदार कार TNGA-K प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यामध्ये 2.5 लीटर सिंगल हायब्रिड-पेट्रोल इंजिन दिले आहे जे e-CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असून ते 193 bhp ची कमाल पॉवर आणि 240 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

नुकतेच कंपनीकडून त्याचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यातील प्रकाश पूर्णपणे एलईडी आहे. तसेच या कारमध्ये 6 स्लॉट फ्रंट ग्रिल, रियर बंपर, अपडेटेड फ्रंट, नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.

या कारच्या केबिनमध्ये मोठी 14-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड्स अप डिस्प्ले, मेमरी फंक्शनसह 8-वे पॉवर ड्रायव्हर सीट, पॉवर सन ब्लाइंड्स, JBL साउंड सिस्टम, दुसऱ्या सीट रोसाठी मसाज फंक्शनसह कॅप्टन सीट्स आणि सनरूफ देण्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला कारमध्ये 60 पेक्षा जास्त फीचर्स पाहायला मिळतील.

जर कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ऑल व्हील डिस्क ब्रेक, 6 मानक एअरबॅग्ज, वाहन स्थिरता नियंत्रण, लेन कीप असिस्ट तसेच अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी भन्नाट फीचर्स दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोयोटा वेलफायरला भारतीय बाजारात थेट स्पर्धा नाही. परंतु ती 2024 मध्ये येणाऱ्या नवीन मर्सिडीज-बेंझ व्ही क्लासला कडवी टक्कर देऊ शकता.