Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Toyota Vellfire : कार नाही राजवाडाच! शक्तिशाली इंजिन, लक्झरी फीचर्ससह येणाऱ्या टोयोटाच्या या भन्नाट कारचे बुकिंग सुरु, जाणून घ्या फीचर्स

टोयोटा कंपनीकडून नेहमी लक्झरी आणि आलिशान कार बनवल्या जातात. तसेच ग्राहकही अशा कारला चांगला प्रतिसाद देत आहेत. कंपनीकडून आता लवकरच भारतामध्ये आणखी एक आलिशान कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

0

Toyota Vellfire : टोयोटा कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत अनेक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच टोयोटाच्या कारला ग्राहकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. टोयोटा कंपनीकडून नेहमी लक्झरी आणि महागड्या कार बनवल्या जातात.

आता टोयोटो कंपनीकडून लवकरच एक आलिशान लक्झरी कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार पाहून तुम्ही देखील त्या कारला राजवाडाच म्हणाल. कारण या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.

जपानी कार निर्माता टोयोटा कंपनीकडून वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी MPV कार जागतिक स्तरावर सादर केली आहे. तसेच आता देशातील काही टोयोटा डिलर्सशीपकडून या कारच्या अनधिकृत बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या कारच्या बुकिंगसाठी डिलर्सकडून 2 लाख ते 5 लाख रुपये आकारले जात आहेत.

ज्या ग्राहकांनी जुन्या टोयोटा वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी MPV कारसाठी बुकिंग केले आहे त्या ग्राहकांना आता नवीन सुधारित श्रेणीमधील Vellfire कारसाठी बुकिंग केले जात आहे. सप्टेंबर २०२३ च्या उत्तरार्धात ही कार ग्राहकांना दिली जाण्याची अपेक्षा ग्राहकांना आहे.

ही नवीन वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी MPV कार जुन्या वेलफायर कारपेक्षा अधिक आकर्षक आहे. तसेच कंपनीकडून या कारमधील सीटच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

Toyota Vellfire
Toyota Vellfire

या कारमध्ये वाहन कार्ये नियंत्रित करण्यासाठी एक मोठा ओव्हरहेड कन्सोल, एकाधिक एसी व्हेंट्स आणि नवीन डिझाइन केलेले पुल-डाउन सन शेड्स असे बदल पाहायला मिळतील. तसेच अनेक दमदार वैशिष्ट्ये देखील या कारमध्ये देण्यात आली आहेत.

वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी MPV कारमध्ये पॉवरफुल स्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक एसी, प्रीमियम सीट्स, एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल, मल्टीपल एअरबॅग्ज यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी कारमध्ये २ इंजिन देण्यात आले आहेत. पहिले टर्बोचार्ज केलेले 2.4-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन या कारमध्ये देण्यात आले आहे. जे 275hp आणि 430Nm टॉर्क जनरेट करते.

तसेच दुसरे 2.5-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. जे एकत्रित पॉवर आउटपुट 250hp आहे. हे इंजिन e-CVT ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. मात्र टोयोटा कंपनीकडून वेलफायर अल्ट्रा-प्रिमियम लक्झरी कार भारतामध्ये कधी लॉन्च होईल याबाबत अजूनही अधिकृत माहिती दिलेली नाही.