Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Turbo Petrol Engine Cars : टर्बो पेट्रोल इंजिन आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी! खरेदी करा या टॉप 5 परवडणाऱ्या कार, पहा यादी

टर्बो पेट्रोल इंजिन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अनेक एसयूव्ही आणि हॅचबॅक कार ऑटो बाजारात उपलब्ध आहेत. तसेच या कारच्या किमती देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहेत.

0

Turbo Petrol Engine Cars : देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या टर्बो पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या एसयूव्हीव्ही आणि सेडान कार उपलब्ध आहेत. टर्बो पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या कारच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तसेच अशा कार्स १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

तुम्हालाही टर्बो पेट्रोल इंजिनसह येणारी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटा मोटर्सपासून महिंद्रापर्यंतच्या अनेक कार्स उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील कमी असल्याने तुम्ही सहज या कार खरेदी करू शकता.

खालील कार टर्बो पेट्रोल इंजिनसह येतात

महिंद्रा XUV300

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची XUV300 ही एसयूव्ही कार देखील टर्बो पेट्रोल इंजिनसह येत आहे. कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 109 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. उत्तम बिल्ड गुणवत्तेची ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सच्या नेक्सॉन कारमध्ये देखील टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. अलीकडेच टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारला ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.1 लाख रुपये आहे.

निसान Magnite

निसान कार उत्पादक कंपनीची Magnite एसयूव्ही कार तुमच्यासाठी टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 99 एचपी आणि 160 एनएम टॉर्क जनरेट करते. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.25 लाख रुपये आहे.

सिट्रोएन C3

तुम्हीही टर्बो पेट्रोल इंजिन असलेली स्वस्त कार शोधत असाल तर तुमच्यासाठी सिट्रोएन C3 ही कार सर्वोत्तम पर्याय आहे. कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 109 एचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करते. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.2 लाख रुपये आहे.

टाटा अल्ट्रोझ

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय दिला आहे. त्यांच्या अल्ट्रोझ हॅचबॅक कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. टाटा अल्ट्रोझ कारची एक्स शोरूम किंमत 9.1 लाख रुपये आहे.