Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

TVS Bike : TVS ची ही बाईक देते 70 kmpl चे मायलेज! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव, किंमतही खूपच कमी

नवीन बाईक खरेदी करायची असेल तर मायलेजच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी TVS Sport ही बाईक सर्वोत्तम आहे. तसेच या बाईकची किंमत देखील खूपच कमी आहे.

0

TVS Bike : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना बाईक वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेकजण सध्या नवीन बाईक खरेदी करताना जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईक शोधत असतात. जर तुम्हालाही जबरदस्त मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल तर TVS Sport बाईकचा सर्वोत्तम पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

तुम्ही जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईक शोधत असाल तर तुम्हाला TVS Sport बाईक हा एक चांगला पर्याय आहे. ही बाईक 70 kmpl मायलेज देते. तसेच या बाईकची किंमत देखील कमी असल्याने तुमच्या बजेटमधील बाईक ठरू शकते.

TVS Sport या बाईकची एक्स शोरूम किंमत 63,990 हजार रुपये आहे. तसेच या बाईकमध्ये कंपनीकडून अनेक फीचर्स देखील देण्यात येत आहेत. तसेच मजबूत बाईक म्हणून देखील या बाईकला ओळखले जाते.

बाईकचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे

TVS Sport या बाईकचे नाव ऑन रोड मायलेजमुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. या बाईकमध्ये कंपनीकडून 109.7cc इंजिन देण्यात येते. हे इंजिन 8.29 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते.

बाइकला 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे

TVS Sport बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच ही बाईक प्रतितास ९० किमी वेगाने धावू शकते. या बाईकमध्ये जबरदस्त सस्पेन्शन देण्यात आले आहे. त्यामुळे खराब रस्त्याने बाईक चालवताना तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

बाईकला 10 लिटरची मोठी इंधन टाकी

TVS Sport बाईकमध्ये इंधन साठवण्यासाठी 10 लिटरची टाकी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बाईकमध्ये दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक ग्राहकांना ६ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बाईकचे एकूण वजन 112 किलो आहे.

पाच रंग आणि एलईडी हेडलाइट

TVS Sport बाईक पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच बाईकमध्ये एलईडी हेडलाइट, डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे. TVS Sport ची ही बाईक Hero HF 100, Hero HF Deluxe, Honda CD 110 Dream, Bajaj CT 110X आणि Bajaj Platina 100 स्पर्धा करते.