Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

TVS Radeon Bike : मस्तच! अवघ्या 1999 रुपयांमध्ये घरी आणि TVSची शानदार बाईक, मिळतात उत्कृष्ट फीचर्स

बाईक खरेदी करायची आहे पण बजेट नाही तर काळजी करू नका. कारण आता अगदी कमी किमतीत तुम्ही बाईक घरी आणू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज देखील नाही.

0

TVS Radeon Bike : दुचाकी उत्पादक कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक बाईक्स सादर केल्या आहेत. या बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र बाईकच्या किमती जास्त असल्याने कमी बजेट ग्राहकांना त्या खरेदी करता येत नाहीत.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये 100cc ते 125cc सेगमेंटमधील बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेत TVS दुचाकी उत्पादक कंपनीने त्यांची Radeon शानदार बाईक ऑटो मार्केटमध्ये सादर केली आहे. या बाईकच्या बॉडीपासून ते सस्पेन्शनपर्यंत सर्व गोष्टींची रचना अतिशय आकर्षक आहे.

तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला TVS Radeon बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण TVS कडून त्यांच्या बाईकवर चांगली ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे अगदी कमी किमतीत तुम्ही Radeon बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

TVS ची धमाकेदार ऑफर

सप्टेंबर महिन्यामध्ये TVS Radeon बाईकवर चांगली ऑफर देण्यात येत आहे. या ऑफर अंतरंगात तुम्ही ही बाईक अगदी सहज खरेदी करू शकता. तुम्ही ही बाईक खरेदी करण्यासाठी अगदी 15,999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून ही बाईक घरी आणू शकता.

या बाईकची एक्स शोरूम किंमत 60,925 रुपये आहे. फक्त 1999 रुपयांच्या दरमहा EMI वर TVS Radeon बाईक खरेदी करू शकता. या बाईकवर घेतलेल्या कर्जावर तुमच्याकडून ६.९९% व्याज आकारले जाईल.

इंजिन आणि पॉवर

TVS कंपनीकडून Radeon बाईकमध्ये BS6 109.7 cc Dura-Life इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9.5 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

TVS Radeon बाईक 69.3 Kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही बाईक सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (SBT) वैशिष्ट्याने सुसज्ज आहे जी प्रभावी ब्रेकिंग प्रदान करते. त्यामुळे तुमच्यासाठी ही बाईक सर्वोत्तम पर्याय आहे.

डायमेंशन

बाईकच्या डायमेंशनबद्दल सांगायचे झाले तर Radeon बाईकची रुंदी 705 मिमी, लांबी 2006 मिमी आणि उंची 1070 मिमी देण्यात आले आहे. तसेच बाईकला 1265 व्हीलबेस आणि 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. बाईकचे वजन 112 किलो आहे.

Radeon बाईकला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे तर मागील बाजूस 5 स्टेप अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऍब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आले आहे. आरामदायी आणि मऊ सीट्समुळे या बाईकवरून तुम्ही लांबचा प्रवास अगदी सहज करू शकता.