Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

प्रतीक्षा संपली! बोल्ड लूक आणि मजबूत इंजिनसह बाजारात आली ‘ही’ जबरदस्त बाइक; जाणून घ्या किंमत । TVS Ronin

TVS Ronin शानदार फीचर्स आणि बेस्ट मायलेज तसेच मजबूत इंजिनसह इंडोनेशियामध्ये लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या बाइकच्या लूकवर जास्त काम केला आहे.

0

TVS Ronin: लोकप्रिय  ऑटो कंपनी  TVS Motors ने आपली नवीन बाइक TVS Ronin शानदार फीचर्स आणि बेस्ट मायलेज तसेच मजबूत इंजिनसह इंडोनेशियामध्ये लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या बाइकच्या लूकवर जास्त काम केला आहे.

कंपनीने ही बाइक अतिशय बोल्ड लूकसह बाजारात लाँच केली आहे. याच बरोबर कंपनीने ग्राहकांच्या सेफ्टीसाठी एकापेक्षा एक जबरदस्त सेफ्टी फीचर्स या नवीन TVS Ronin बाइकमध्ये दिले आहे.

हे जाणून घ्या कि कंपनीने इंडोनेशियामध्ये TVS Ronin 2 व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. Ronin SS सिंगल टोन सिंगल चॅनल ABS सह, आणि Ronin TD ट्रिपल टोन ड्युअल चॅनल ABS सह बाजारात सादर करण्यात आले आहे.  कंपनी या महिन्यापासून टीव्हीएस मोटरच्या निवडक आउटलेटवर या बाइकची विक्री सुरू करेल. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि नवीन बाइकबद्दल संपूर्ण माहिती.

TVS Ronin इंजिन

कंपनीने या बाइकमध्ये 225 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.4 PS कमाल पॉवर आणि 19.93 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तसेच, बाइकचे वजनही जवळपास 160 किलो आहे. कंपनीने या बाइकमध्ये कंपनीने अर्बन एबीएस मोड, ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (जीटीटी) आणि व्हॉईस आणि राइड असिस्टन्स सारखी फीचर्स देखील दिली आहेत.

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर TVS Ronin मध्ये मॉडर्न आणि रेट्रोचे कॉम्बिनेशन दिसत आहे. यात सिग्नेचर टी-साइजचे पायलट लाईट , स्पीडोमीटर, एक्झॉस्ट आणि मफलर डिझाइन, चेन कव्हर, नऊ-इंच स्पोक अलॉय व्हील आणि ब्लॉक ट्रेड टायर्ससहऑल -एलईडी लाइट देण्यात आली आहे.

TVS Ronin फीचर्स

TVS Ronin च्या फीचर्सबद्दल बोलताना कंपनीने डिजिटल क्लस्टर, ईटीए, गियर शिफ्ट असिस्ट, साइड स्टँड इंजिन इनहिबिटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेशन, कमी बॅटरी इंडिकेटर, व्हॉईस असिस्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल अलर्ट/रिसीव्ह दिले आहेत आणि TVS Ronin मध्ये TVS SmartXonnectTM app राइड अॅनालिसिस, रेन आणि अर्बन ABS मोड, सिंगल आणि ड्युअल चॅनल ABS, इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG), लो नॉइज फेदर टच स्टार्ट, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क (USD), रीअर मोनोशॉक, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखी अडव्हान्स फीचर्स उपलब्ध आहेत.

TVS Ronin किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 1.49 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.68 लाख रुपये खर्च करावे लागतील.