Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

TVS Sports Bike : बाईक खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण! अवघ्या ७ हजारांत घरी आणा TVS Sports बाईक, पहा कसे ते…

बाईक खरेदी करण्यासाठी बजेट कमी आहे? तर टेन्शन घेऊ नका. कारण आता अवघ्या ७ हजार रुपयांमध्ये तुम्ही TVS Sports बाईक घरी आणू शकता.

0

TVS Sports Bike : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनके कंपन्यांच्या उत्तम दुचाकी उपलब्ध आहेत. या दुचाकीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र बाईकच्या किमती जास्त असल्याने कमी बजेट ग्राहकांना त्या खरेदी करता येत नाहीत.

तुमचेही बजेट कमी असेल आणि स्वप्नातील बाईक खरेदी करायची असेल तर काळजी करू नका. कारण आता TVS Sports बाईक तुम्ही अवघ्या ७ हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. या बाईकची किंमत देखील कमी आहे मायलेज देण्यास देखील सक्षम आहे.

TVS Sports बाईक किंमत

कमी बजेट ग्राहकांसाठी TVS Sports बाईक उत्तम पर्याय आहे. बाईकमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. TVS Sports बाईकची एक्स शोरूम किंमत 64,050 रुपये आहे. तर याच बाईकची ऑन रोड किंमत 75,082 रुपये आहे.

TVS Sports बाईकवर फायनान्स प्लॅन दिला जात आहे. त्यामुळे कमी बजेट ग्राहक अगदी ७ हजार रुपयांचे डाऊनपेमेंट भरून बाईक घरी आणू शकतात. फायनान्स प्लॅनबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही जवळच्या TVS डिलरशिपला भेट देऊन घेऊ शकता.

TVS स्पोर्ट्स फायनान्स योजना

TVS दुचाकी कंपनीकडून त्यांच्या स्पोर्ट्स बाईकवर उत्तम फायनान्स प्लॅन देण्यात आला आहे. 7,000 रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये ही बाईक ग्राहक घरी आणू शकतात. 7,000 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला 68,000 रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाईल.

या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक 9.7 टक्के व्याजदर आकारले जाईल. हे कर्ज तुम्हाला 36 महिन्यांसाठी दिले जाईल. 36 महिन्यांमध्ये दरमहा तुम्हाला 2,187 रुपयांचा EMI भरावा लागेल.

TVS स्पोर्ट्स इंजिन आणि वैशिष्ट्ये

TVS स्पोर्ट्स बाईकमध्ये शक्तिशाली 109.7 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन चार-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकला 10 लीटरची इंधन टाकी दिली आहे. तसेच TVS स्पोर्ट्स बाईकला ARAI कडून 70 Kmpl मायलेजचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

एकदा टाकी फुल भरल्यानंतर बाईक 700 किमी पर्यंत धावू शकते. बाईकला टेलिस्कोपिक आणि हायड्रॉलिक शॉक सस्पेन्शन दिले आहे. पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.