Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 1 Lakh Bikes : कमी किमतीत दमदार मायलेज बाईक्स! 1 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा या उत्कृष्ट बाईक्स, पहा यादी

तुम्हीही १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बाईक खरेदीसाठी बाईक शोधत असाल तर बजाजपासून हिरोपर्यंतच्या अनेक बाईक्स ऑटो बाजारात उपलब्ध आहेत.

0

Under 1 Lakh Bikes : दैनंदिन वापरासाठी आजकाल अनेकजण बाजारात शानदार मायलेज देणाऱ्या बाईक्स शोधत असतात. पण ऑटो बाजारात बाईक्सच्या किमती देखील अधिक आहेत. बजेट १ लाख असेल तर तुम्ही दमदार मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करू शकता.

भारतीय ऑटो बाजारात १ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत. या बाईक मायलेजच्या बाबतीत देखील सर्वांच्या पुढे आहेत. त्यामुळे या बाईक्स खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

खालील बाईक्स १ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

हिरो एचएफ डिलक्स

हिरो ही देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो बाईक्स दरवर्षी विक्री होत असतात. हिरो एचएफ डिलक्स बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या बाईकमध्ये 97.2 cc इंजिन देण्यात आले आहे.

एचएफ डिलक्स बाईकचे इंजिन 8000 Rpm वर 7.94 Bhp पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 4 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 65,938 रुपये आहे.

TVS स्पोर्ट

टीव्हीएस दुचाकी कंपनीची कमी बजेट बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी TVS स्पोर्ट बाईक उत्तम आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64,050 रुपये आहे. या बाईकमध्ये 109.7 cc सिंगल सिलेंडर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.29PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते.

बजाज प्लॅटिना 100

बजाज दुचाकी कंपनीच्या बाईक दमदार मायलेज आणि कमी किमतीची ओळखल्या जातात. बजाज प्लॅटिना 100 बाईक खरेदीसाठी सर्वोत्तम बाईक आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64,653 रुपये आहे. या बाईकमध्ये 102cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 7.77 bhp ची पॉवर आणि 5,500 rpm वर 8.34 Nm टॉर्क जनरेट करते.

बजाज सीटी 110X

बजाज सीटी 110X ही बाईक देखील सर्वोत्तम बाईक आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 67,322 रुपये आहे. बाईकमध्ये 115 सीसी इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 8 bhp पॉवर आणि 5,000 rpm वर 10 Nm टॉर्क जनरेट करते.

बजाज प्लॅटिना 110

१ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करायची असेल तर प्लॅटिना 110 बाईकचा पर्याय उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 115.45cc 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 7000 Rpm वर 8.48 Hp पॉवर आणि 5000 Rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 69,216 रुपये आहे.