Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh Automatic SUVs : या आहेत देशातील लोकप्रिय ऑटोमॅटिक SUV, किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी…

तुम्हीही स्वस्तातील ऑटोमॅटिक SUV कार शोधत असाल तर तुमच्यासाठी मारुतीपासून ह्युंदाईपर्यंत अनेक कार उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहेत.

0

Under 10 Lakh Automatic SUVs : आजकाल शहराच्या ठिकाणी अनेकदा ट्रॅफिकची समस्या पाहायला मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना चालकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सतत कारचा गिअर आणि क्लच दाबून चालक थकून जातो.

मात्र आता जर तुम्हालाही वारंवार ट्रॅफिकमधून प्रवास करावा लागत असेल तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या एसयूव्ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. या कारमध्ये तुम्हाला मॅन्युअल कारसारखे सतत गिअर काढावे लागणार नाहीत.

खालील कार ऑटोमॅटिक कार १० लाखांच्या बजेटमध्ये येतात

मारुती सुझुकी इग्निस

मारुती सुझुकीकडून नेहमीच ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या कार सादर केल्या जात आहेत. मारुती सुझुकीच्या इग्निस कारमध्ये देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात येत आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. ही कार डेल्टा, झेटा आणि अल्फा या तीन मॉडेलमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ६.९३ ते ८.१६ लाख रुपये आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वात लहान एसयूव्ही कार पंचमध्ये देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या एएमटी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.50 रुपयांपासून सुरु होते ते 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या मायक्रो एसयूव्ही Exter कारमध्ये AMT गिअरबॉक्स दिला जात आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारची एकूण सहा AMT व्हेरियंट उपलब्ध आहेत. Exter कारच्या AMT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.97 लाख रुपयांपासून सुरु होते ते 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी Fronx

मारुती सुझुकीकडून Fronx एसयूव्ही कारमध्ये देखील 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या दोन मॉडेलमध्ये AMT पर्याय देण्यात आला आहे. कारच्या AMT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.88 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 8.88 लाख रुपयांपर्यंत जाते.