Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh Cars : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरेदी करा या शानदार SUVs, किंमत 10 लाखांपेक्षा कमी, पहा यादी

उद्या गणेश चतुर्थी आहे. या शुभ दिवशी तुम्हीही 10 लाखांपेक्षा कमी किमतीतील शानदार एसयूव्ही कार खरेदी करू शकता. मारुतीपासून टाटापर्यंत अनेक एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत.

0

Under 10 Lakh Cars : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये अनेकजण नवीन कार आणि बाईक्स खरेदी करत असतात. सध्या ऑटो बाजारात एसयूव्ही कारची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून नवीन एसयूव्ही ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या जात आहेत.

तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर १० लाखांपेक्षा कमी किमतीत शानदार एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर अनेक कार उपलब्ध आहेत. मारुतीपासून तर टाटापर्यंतच्या अनेक जबरदस्त एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत.

खालील एसयूव्ही कार १० लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी बजेट कार सादर केल्या जातात. मारुतीची ब्रेझा एसयूव्ही खरेदीसाठी उत्तम पर्याय आहे. ही कार सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही कार ठरली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन कारचे नवीन मॉडेल नुकतेच बाजारात सादर केले आहे. नेक्सॉन एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसयूव्ही कारमध्ये नेक्सॉन कार खरेदी करणे उत्तम ठरू शकते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.60 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Venue

ह्युंदाई मोटर्सकडून देखील अनेक एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. ह्युंदाईची Venue एसयूव्ही कार कमी बजेट ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.77 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.18 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Exter

ह्युंदाईने त्यांची अलीकडेच आणखी एक मायक्रो एसयूव्ही कार Exter सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून देखील त्यांच्या अनेक सुरक्षित एसयूव्ही कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. पंच एसयूव्ही कार देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.