Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 lakh EV Cars : आता पेट्रोल पंपावर जाणे विसरा! खरेदी करा 315 किमी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार, किंमत १० लाखांपेक्षा कमी

बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाहीत. पण १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये दोन इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत.

0

Under 10 lakh EV Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना इंधनावरील वाहने चालवणे न परवडण्यासारखे झाले आहे. मात्र आता पेट्रोल आणि डिझलेला पर्याय म्हणून बाजारात इलेक्ट्रिक कार आल्या आहेत.

भारतीय ऑटो क्षेत्रात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे कमी बजेट ग्राहकांना त्या खरेदी करणे देखील शक्य नाही. मात्र ऑटो मार्केटमध्ये दोन स्वस्त इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत ज्या तुम्ही १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.

देशातील ऑटो बाजारातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केली आहेत. टाटा मोटर्सच्या एका इलेक्ट्रिक कारची किंमत देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

खालील कार १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत

MG Comet EV

MG कार उत्पादक कंपनीने त्यांची स्टायलिश आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ७.९८ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ९.९८ लाख रुपये आहे.

सिंगल चार्जमध्ये MG Comet इलेक्ट्रिक कार 230 किलोमीटरची रेंज देते. ही एक ४ सीटर कार आहे. ही इलेक्ट्रिक कार जीएसईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कारमध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील देण्यात आली आहे.

MG Comet इलेक्ट्रिक कारमध्ये 17.3kWh लिथियम-आयन बॅटरीसह शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. ही मोटार 42 PS पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. कारची बॅटरी चार्जिंग होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात. कारची बॅटरी 5 तासांत 80 टक्के चार्ज होते.

Tata Tiago EV

टाटा मोटर्सकडून अगदी कमी बजेटमध्ये त्यांच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून दिली आहे. Tiago EV कारची एवेक्स शोरूम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.04 लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा मोटर्सकडून या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन वेगवेगळे बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. पहिला बॅटरी 24kWh आहे जो सिंग्ज चार्जमध्ये 315 किमी रेंज देतो. तर दुसरा बॅटरी पॅक 19.2 kWh आहे जो 250 किमी पर्यंत रेंज देतो.

Tiago EV कारमध्ये रिमोट एसी चालू/बंद तापमान सेटिंग, रिमोट जिओ-फेन्सिंग, कार लोकेशन ट्रॅकिंग, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, रिमोट व्हेईकल हेल्थ डायग्नोस्टिक्स, रिअल-टाइम चार्ज स्टेटस, डायनॅमिक चार्जर लोकेटर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.