Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh Sedan Cars : 31 Kmpl मायलेज आणि किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी! खरेदी करा या 6 स्टायलिश सेडान कार…

भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु असला तरी आताही अनेक सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती ते होंडापर्यंतच्या अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत.

0

Under 10 Lakh Sedan cars : देशात एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु असला तरी आजही अनेक लोकप्रिय सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही नवीन सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम सेडान कार उपलब्ध आहेत.

मारुती डिझायर

मारुती सुझुकीच्या डिझायर सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे. ही सीएनजी कार 31.12 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ड्युअल एअरबॅग्ज, अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, स्पीड अलर्ट, ABS आणि EBD, Isofix चाइल्ड सीट अँकर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. या कारच्या सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ६.२४ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ९.१७ लाख रुपये आहे.

मारुती सियाझ

मारुती सुरुकीची सियाझ सेडान कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार सिग्मा, डेल्टा, झेटा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर

टाटा मोटर्सकडून देखील त्यांची टिगोर सेडान कार ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारमध्ये सीएनजी, इलेक्ट्रिक आणि पेट्रोल पर्याय ऑफर करण्यात आला आहे. कारमध्ये ABS आणि EBD, रियर पार्किंग सेन्सर, ड्युअल एअरबॅग्ज, स्पीड ऑटो डोअर लॉक, पंक्चर रिपेअर किट, ABS ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ५.९९ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ७.३९ लाख रुपये आहे.

होंडा ऑरा

होंडा ऑरा सेडान कार देखील लोकप्रिय सेडान कार आहे. ऑरा सेडान कारमध्ये सीएनजी आणि पेट्रोल पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. ही कार एकूण 11 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

या कारमध्ये चाइल्ड सीट अँकर, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग, ऑटो डोअर, सेंटर लॉकिंग, रिअर पार्किंग सेन्सर, एबीएस, ईबीडी, स्पीड अलर्ट सिस्टीम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 6.08 लाख ते 6.08 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Verna

ह्युंदाईची Verna ही सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, डे नाईट मिरर, इमोबिलायझर, सीट बेल्ट प्री-टेन्शनर्स, सेंट्रल लॉकिंग, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, ड्युअल एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट सिस्टम, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर, एबीएस आणि ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 10.96 लाख ते 17.38 लाख रुपये आहे.

होंडा Amaze

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Amaze सेडान कार उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सादर केली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. कारमध्ये ABS आणि EBD, स्पीड अलर्ट, इमोबिलायझर रियर पार्किंग सेन्सर, डिफॉगर, Isofix चाइल्ड सीट अँकर, सीट बेल्ट प्री-टेन्शनर्स, एअरबॅग्ज, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची एक्स शोरूम किंमत ६.६२ लाख ते ९.०१ लाख रुपये आहे.