Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh SUVs : 10 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा या दमदार SUVs, मिळते शक्तिशाली इंजिन

0

Under 10 Lakh SUVs : ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च केल्या आहेत. तसेच सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड देखील सुरु आहे. अशा काळात अनेक कंपन्यांनी 2023 मध्ये त्यांच्या नवीन SUVs लॉन्च केल्या आहेत.

तुम्हालाही नवीन एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कारमध्ये शक्तिशाली इंजिन देखील उपलब्ध आहे.

Tata Nexon Facelift SUV

टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉन्च होताच ही देशातील नंबर वन एसयूव्ही कार बनली आहे. कारमध्ये 1199cc आणि 1497cc इंजिन देण्यात आले आहे.

पेट्रोल डिझेल इंजिन पर्याय कारमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 382 लीटर बूट स्पेस आणि 6 एअरबॅग्ज देण्यात आले आहे. Nexon चे फेसलिफ्ट पेट्रोल व्हेरियंट 17.44 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर डिझेल व्हेरियंट 24.08 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरु होते.

Hyundai Exter

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही कार Exter 2023 मध्ये लॉन्च केली आहे. या एसयूव्ही कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कारमध्ये 1.2-लीटर कप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 83 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी Fronx

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कार देखील याच वर्षी सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. कारची किंमत 7.46 लाख रुपयांपासून सुरु होते.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच एसयूव्ही कारमध्ये या वर्षी कंपनी फिटेड सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. या कारमध्ये 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आणि 1.2-लीटर रेव्होट्रॉन सीएनजी इंजिन देण्यात आले आहे.

कारचे सीएनजी व्हेरियंट 26.99 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. पंच सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरु होते.