Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh Upcoming SUVs : 10 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च होणार या 4 SUVs, पहा यादी

२०२४ हे नवीन वर्ष भारतीय ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे. या वर्षात अनेक नवनवीन कार दाखल होणार आहेत. सध्या अनेक कंपन्या त्यांच्या नवीन कारवर काम करत आहेत.

0

Under 10 Lakh Upcoming SUVs : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करत आहे. २०२४ मध्ये ग्राहकांना आणखी नवीन एसयूव्ही कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

भारतीय ऑटो मार्केटसाठी २०२४ हे वर्ष खास असणार आहे. कारण या नवीन वर्षांमध्ये आणखी नवीन डॅशिंग एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या एसयूव्ही कारच्या किमती देखील १० लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

1. टाटा पंच EV

टाटा मोटर्सची बहुचर्चित पंच कारचे EV मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. Gen 2 Sigma आर्किटेक्चरवर आधारित पंच एसयूव्ही कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाईल.

कारची किंमत १० लाखांपेक्षा कमी असू शकते. सिंगल चार्जमध्ये 300 किमीपेक्षा जास्त रेंज देणारा 30kWh चा बॅटरी पॅक कारमध्ये दिला जाऊ शकतो. पंच EV कार अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.

2. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार कंपनीकडून एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये सादर केले जाईल. या कारची चाचणी देखील सुरु केली आहे.

कारच्या इंटेरियरमध्ये पाहायला मिळू शकतात. तसेच डिझाईनमध्ये देखील बदल केले जातील. AMT गिअरबॉक्स योग्य टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने बदलला जाऊ शकतो. या कारची किंमत देखील १० लाखांपेक्षा कमी असू शकते.

3. Toyota Taisor

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Taisor एसयूव्ही कार २०२४ मध्ये लॉन्च केली जाईल अशी अपेक्षा आहे. ही कार मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित असणार आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय मिळेल.

1.0-लीटर बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.2 लिटर K12C पेट्रोल इंजिन पर्याय मिळू शकतात. कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

4. किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल नवीन बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये Sonet एसयूव्ही कार फेसलिफ्ट मॉडेल सादर केले जाऊ शकते. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत मोठे बदल केले जाऊ शकतात. ही कार देखील चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.